May 18, 2024

रेडॉन रायडर्सने साजरा केला क्रिकेटच्या देवाचा वाढदिवस!!

पुणे, 26/04/2023 – क्रिकेटचा देव म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा ५० वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. वाढदिवस साजरा करण्यासाठी पुण्यातून सुमारे १२५ रायडर्स रोटी गावातील ‘फोर सीझन्स वायनरी’ मध्ये मोटरसायकलद्वारे सहभागी झाले होते. या अभूतपूर्व सोहळ्यात सर्वानी आपल्या  बाईकवर सचिनचे बॅनर आणि पोस्टर्स आणि पाठीवर स्टिकर्स लावून  वातावरण पूर्ण सचिनमय केले. प्रत्येक रायडरने  त्यांच्या चेहऱ्यावर सचिनचे मुखवटे आणि पोस्टर्स उंच धरून एकसुरात  “सचिन सचिन!”. नावाचा जल्लोष करून वाढदिवस साजरा केला. अपोलो टायर्स प्रायोजित रेडॉन रायडर्सने सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त या राईडचे भव्य आयोजन केले होते.

रेडॉन रायडर्स  हा भारतातील सर्वात मोठा (स्रोत IBW 2022), सक्रिय, पुणे स्थित ISO प्रमाणित, ट्रेडमार्क नोंदणीकृत रायडिंग ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त हॉर्सपॉवरच्या मोटारसायकल सामाविष्ट आहेत, महिलांचा सहभाग हि पण एक अभिमानाची गोष्ट या ग्रुपची नक्कीच आहे.  कार्यक्रमाचे नियोजन ग्रुपच्या कॅप्टन स्मिता मॅस्केरहन्स, डॉ.किशोर शिंदे, अॅड.नरेश शेळके यांनी केले. रेडॉन रायडर्सच्या समितीतील सुमित गोरे, जेरी डिक्रूझ, भाग्येश क्षीरसागर, बापू गायकवाड, अजित सिंग आणि अक्षय विसपुते यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी उपस्थित असलेल्या ग्रुपच्या कॅप्टन स्मिता मॅस्केरहन्स म्हणाल्या की, रेडॉन रायडर्स हे संपूर्ण बायकिंग बंधुत्व आहे हे नेहमीच महिलांना सुरक्षित आणि प्रोत्साहित करणारे नेहमीच ठरले आहे. आम्ही सर्व कार्यक्रम ,उत्सव, क्षण अतिशय आनंदाने तितक्याच उत्साहाने नेहमीच एकत्र साजरे करत असतो.

कोअर कमिटी सदस्य डॉ.किशोर शिंदे म्हणाले की, एकूणच हा एक अद्भुत, भव्य कार्यक्रम होता. बाइकिंग समुदाय त्यांचे प्रदर्शन दाखवण्यासाठी एकत्र आले होते. त्यामुळे आपल्या लाडक्या सचिनच्या वाढदिवस सोहळ्यामध्ये रायडर्स अधिक उत्साही आणि आनंदी झाले होते.

राइडचे नेतृत्व करणारे कोअर कमिटी सदस्य अॅड. नरेश शेळके यांनी शिस्त आणि प्रयोजनाबद्दल आणि सहभागाबद्दल संपूर्ण  ग्रुपचे कौतुक केले. या रखरखीत उन्हाळ्याच्या कडक उन्हात रस्त्यावर १२५ रायडर्सचा ग्रुप होता तो केवळ सचिन प्रेमा साठीच असल्याचे ते म्हणाले.