पुणे, 28 जून 2023मध्य रेल्वे पुणे ते विरांगणा राणी लक्ष्मीबाई झाशी दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेनच्या 26 फेऱ्या चालवणार आहे.
01921 स्पेशल 06.07.2023 ते 28.09.2023 पर्यंत दर गुरुवारी 15.15 वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 09.35 वाजता विरांगना राणी लक्ष्मीबाई झाशी येथे पोहोचेल.
01922 स्पेशल विरांगणा राणी लक्ष्मीबाई झाशी येथून दर बुधवारी 05.07.2023 ते 27.09.2023 पर्यंत 12.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11.35 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे: दौंड दोरमार्ग, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, नर्मदापुरम, भोपाळ, विदिशा, बिना आणि ललितपूर.
संरचना: 01 द्रुतीय वातानुकूलित, 05 तृतीय वातानुकूलित, 05 शयनयान, 04 जनरल सेकंड क्लास आणि 02 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन
आरक्षण: 01921* स्पेशलसाठी बुकिंग 30/06/2023 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कावर उघडेल.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन