June 14, 2024

एमएसएलटीए तर्फे आयोजित रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षाखालील सब-ज्युनियर टेनिस स्पर्धेत रणबीर संधू, भावेश शहा यांचा मानांकीत खेळाडूंवर विजय

मुंबई, 11 फेब्रुवारी 2023: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने आयोजित 13व्या रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षाखालील मुले व मुलींच्या ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या पात्रता फेरीत रणबीर संधू व भावेश शहा यांनी मानांकीत खेळाडूंवर विजय मिळवत पात्रता फेरीच्या दुस-या चरणात प्रवेश केला.

जीए रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात पंजाबच्या बिगर मानांकीत
रणबीर संधूने उत्तर प्रदेशच्या तिस-या मानांकीत आरव भल्लाचा 9-2 असा तर गुजरातच्या भावेश शहाने तेलंगणाच्या सहाव्या मानांकीत विराट कोठाचा 9-3 असा पराभव करत पात्रतेच्या दुस-या फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या अव्वल मानांकीत आरव छल्लानी याने आपल्या राज्य सहकारी अखिलेश चव्हाणचा 9-1 असा तर तेलंगणाच्या दुस-या मानांकीत सुजाई पोथुलाने गुजरातच्या रियान नंदनकाचा 9-3 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- पहिली पात्रता फेरी
आरव छल्लानी (महाराष्ट्र)(1) वि.वि अखिलेश चव्हाण(महाराष्ट्र) 9-1
सुजाई पोथुला (तेलंगणा)(2) वि.वि रियान नंदनका(गुजरात) 9-3
रणबीर संधू (पंजाब) वि.वि आरव भल्ला (उत्तर प्रदेश) (3) 9-2
निब्रास हुसेन (आसाम)(4) वि.वि सादिक मेहरा(हरयाणा) 9-0
वीर चतुर (महाराष्ट्र)(5) वि.वि रुहान तलरेजा(मध्य प्रदेश) 9-0
भावेश शहा (गुजरात) वि.वि विराट कोठा (तेलंगणा)(6) 9-3
कियान पटेल(महाराष्ट्र) (7) वि.वि अझलान शरीफ(महाराष्ट्र) 9-5
हुसेन सैफी (मध्य प्रदेश) (8) वि.वि विवान नाटेकर (महाराष्ट्र) 9-2
ध्रुव शर्मा (कर्नाटक) (9) वि.वि वचन प्रसाद (कर्नाटक) 9-5
कबीर गुंदेचा(महाराष्ट्र) वि.वि तनव डेंडुकुरी(तेलंगणा) 9-8(5)
विश्वास चंद्रशेखरन (महाराष्ट्र) वि.वि हिमांशू देसाई (महाराष्ट्र) 9-2
सौरष रे (हरयाणा) वि.वि आरव गर्ग (महाराष्ट्र) 9-1
सार्थक महाजन (महाराष्ट्र) वि.वि प्रणव कोकरे (महाराष्ट्र) 9-5
अश्विक पटेल (गुजरात) वि.वि अवि मिश्रा (महाराष्ट्र) 9-5
आरव शहा(महाराष्ट्र) वि.वि सारंग पंचाक्षरी(महाराष्ट्र) 9-1
यशवंतराजे पवार (महाराष्ट्र) वि.वि अर्जुन सैनी (महाराष्ट्र) 9-0