July 22, 2024

तिसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत रावेतकर टायटन्स,सामोसा स्ट्रायकर्स, बाँगव्हीला निंजाज संघांचे विजय

पुणे, 12 जुन 2024: पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित तिसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत साखळी फेरीत रावेतकर टायटन्स,सामोसा स्ट्रायकर्स, बाँगव्हीला निंजाज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजय मिळवला.

पीवायसी हिंदू जिमखाना क्लब येथील मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत निशित हेगडे(2, 6, 9मि.)याने केलेल्या हॅट्रिक कामगिरीच्या जोरावर रावेतकर टायटन्स संघाने फाल्कन्स संघाचा ३-१ असा पराभव केला. पराभूत संघाकडून सत्यजीत नाईक निंबाळकर(18मि.)याने एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात सामोसा स्ट्रायकर्स संघाने ओव्हनफ्रेश टस्कर्स संघाचा 5-1 असा पराभव करत शानदार सुरुवात केली. सामोसा स्ट्रायकर्सकडून यश भिडे(3,8,12,19मि.)याने चार गोल,तर क्षितिज लोहिया(20मि.)ने एक गोल केला.

अन्य लढतीत बाँगव्हीला निंजाज संघाने ओव्हनफ्रेश टस्कर्स संघाचा 4-1 असा पराभव करून पहिला विजय मिळवला. निंजाजकडून श्रीनिवास चाफळकर 28, 42मि.)याने दोन गोल, तर तनिश दादलानी(4मि.), अलख गाडा(16मि.)यांनी प्रत्येकी एक गोल केला.

निकाल: साखळी फेरी:
रावेतकर टायटन्स: 3(निशित हेगडे 2, 6, 9मि.) वि.वि.फाल्कन्स: 1(सत्यजीत नाईक निंबाळकर 18मि.);

सामोसा स्ट्रायकर्स: 5 (यश भिडे 3,8,12,19मि., क्षितिज लोहिया 20मि.)वि.वि.ओव्हनफ्रेश टस्कर्स: 1(सिद्धांत शेट्टी 28मि.);

बाँगव्हीला निंजाज: 4(तनिश दादलानी 4मि., अलख गाडा 16मि., श्रीनिवास चाफळकर 28, 42मि.) वि.वि.ओव्हनफ्रेश टस्कर्स: 1(सिद्धांत शेट्टी 12मि.);