पुणे, 10जुन 2024: पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित तिसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत 8 संघांमध्ये एकूण 73 खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना क्लब येथील मैदानावर 11 ते 16 जुन 2024 या कालावधीत रंगणार आहे.
पीवायसी हिंदु जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे व मानद सचिव सारंग लागु म्हणाले की, या स्पर्धेत एकूण 8 संघ असून प्रत्येक संघात 9 खेळाडूंचा समावेश आहे.
अधिक माहिती देताना स्पर्धा संचालक श्री अभिषेक ताम्हाणे म्हणाले कि खेळाडू, जे पी वाय सी क्लबचे सदस्य आहेत त्यांना ऑक्शनच्या आधाराने 8 संघात विभागण्यात आले आहे. संघ पुढीलप्रमाणे विंटेज वायकिंग्स(समीर जोशी),ग्लॅडिएटर्स(हरजीत सिंग माथरू),सामोसा स्ट्रायकर्स(चिनार ओक व यश भिडे), बाँगव्हीला निंजाज(सिद्धार्थ गोखले),रावेतकर टायटन्स(अमोल रावतेकर व पराग चोपडा ),फाल्कन्स(सत्यजीत निंबाळकर व चैतन्य राहातेकर), ओव्हनफ्रेश टस्कर्स(जेहान कोठारी व समीर बाकरे),एससीआय वॉरियर्स(समीर झंवर) हे 8 संघ झुंजणार आहेत. या स्पर्धेला रावेतकर ग्रुप यांनी पुरस्कृत केले आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असुन यामध्ये अभिषेक ताम्हाणे, सारंग लागु, नंदन डोंगरे, अभिषेक भागवत, सिध्दार्थ दाते यांचा समावेश आहे.
More Stories
डेकॅथलॉनच्या १० कि. शर्यतीचे २७ ऑक्टोबर रोजी पुण्यात आयोजन
दहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत इम्पेरियल स्वान्स, साइनुमेरो जालन गोशॉक, ऑप्टिमा फाल्कन्स संघांची विजयी सुरुवात
चौथी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय स्पर्धा उद्यापासून