कोल्हापूर, 17 मे 2023: कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन(केएसए) तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सरदार मोमीन मेमोरियल 14 वर्षांखालील महाराष्ट्र राज्य टेनिस अजिंक्यपद 2023 स्पर्धेत कोल्हापूरच्या अथर्व डकरेने नाशिकच्या इशान तिवारीचा तर पुण्याच्या नमिष हुडने सोलापूरच्या हर्ष सुर्यवंशीचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन(केएसए) टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या अथर्व डकरेने नाशिकच्या इशान तिवारीचा 4-2,4-2 असा एकतर्फी लढतीत पराभव करत दुस-या फेरीत धडक मारली. मुंबईच्या चौथ्या मानांकीत जोहेब पटेलने कोल्हापूरच्या ऋषिकेश होटकरचा 4-0,4-0 असा तर संभाजी नगरच्यासोहम खैरनारने अमरावतीच्या गौरव वडवाणीचा 4-0,4-2 असा पराभव केला. नाशिकच्या प्रज्ञेश देवरेने नागपूरच्या हेरंबा पोहरेचा 4-2,4-0 असा तर पुण्याच्या नमिष हुडने सोलापूरच्या हर्ष सुर्यवंशीचा 4-1, 4-1 सहज पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला .
मुलींच्या गटात नागपूरच्या मिशिका तायडेने सोलापूरच्या विपश्यना सोनवणेचा 4-0,4-1 असा तर संभाजी नगरच्या सृष्टी मिरगेने कोल्हापूरच्या मिशिता इंगवलेचा 4-0, 4-2 असा पराभव केला. नाशिकच्या त्रिशा शेट्टीने सोलापूरच्या भवानी हिरेमठचा 4-0,4-2 असा एकतर्फी लढतीत पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली.
स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती मालोजी राजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे सरचिटणीस माणिक मंडलीक, एमएसएलटीएचे सहसचिव शितल भोसले, कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे सहसचिव राजेंद्र दळवी, सदस्य भाऊ घोडके, एमएसएलटीए सुपरवायझर मेहूल केनिया आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- पहिली फेरी- मुले
सोहम खैरनार (संभाजी नगर) वि.वि गौरव वडवाणी (अमरावती) 4-0,4-2
अथर्व डकरे (कोल्हापूर) वि.वि इशान तिवारी (नाशिक) 4-2,4-2
जोहेब पटेल (4) (मुंबई) वि.वि ऋषिकेश होटकर (कोल्हापूर) 4-0,4-0
प्रज्ञुश देवरे (नाशिक) वि.वि हेरंबा पोहरे (नागपूर) 4-2,4-0
अथर्व डकरे (कोल्हापूर) वि.वि इशान तिवारी (नाशिक) 4-2,4-2
जोहेब पटेल (4) (मुंबई) वि.वि ऋषिकेश होटकर (कोल्हापूर) 4-0,4-0
प्रज्ञुश देवरे (नाशिक) वि.वि हेरंबा पोहरे (नागपूर) 4-2,4-0
नमिष हुड (पुणे) वि.वि हर्ष सुर्यवंशी (सोलापूर) 4-1, 4-1
मुली
मिशिका तायडे (नागपूर) वि.वि विपश्यना सोनवणे (सोलापूर) 4-0,4-1
सृष्टी मिरगे (संभाजी नगर) वि.वि मिशिता इंगवले (कोल्हापूर) 4-0, 4-2
त्रिशा शेट्टी (नाशिक) वि.वि भवानी हिरेमठ (सोलापूर) 4-0,4-2.
सृष्टी मिरगे (संभाजी नगर) वि.वि मिशिता इंगवले (कोल्हापूर) 4-0, 4-2
त्रिशा शेट्टी (नाशिक) वि.वि भवानी हिरेमठ (सोलापूर) 4-0,4-2.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.