पुणे, 2 नोव्हेंबर 2025: द पूना क्लब लिमिटेड आणि पीवायसी हिंदू जिमखाना या पुण्यातील प्रतिष्ठित अशा क्रीडा संस्थांच्या वतीने पहिल्या पूना क्लब पीवायसी पिकल बॉल स्पर्धेत सुमैर पवानी व क्रिश आनंद, आकाश ललवाणी व राहुल गुप्ता, ईशांत रेगे व अनुज मेहता यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पूना क्लब जलतरण संकुलात असलेल्या पिकल बॉल कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत 16 ते 32 वर्षांखालील वयोगटात उपांत्यपूर्व फेरीत सुमैर पवानी व क्रिश आनंद यांनी क्रिश शहा व अंगद ओबेरॉय यांचा 15-12 असा तर, तनिश बेलगलकर व रोनित जोशी या जोडीने तनिष व लियान यांचा 15-12 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. अर्णव घई व रणवीर आनंद यांनी संचित दिवाडकर व अर्जुन राऊत यांचा 15-10 असा पराभव केला. आकाश ललवाणीने राहुल गुप्ताच्या साथीत नित्या शहा व एरॉन थवानी यांचे आव्हान 15-07 असे संपुष्टात आणले.
32 ते 50 वयोगटात उपांत्यपूर्व फेरीत टोनी शेट्टी व रवनीत यांनी पुनीत सामंत व पवन कटारिया यांचा 17-15 असा तर, इशांत रेगेने अनुज मेहताच्या साथीत शरण सिंग व विशाल वाघानी यांचा 15-11 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
16 ते 32 वयोगट:
सुमैर पवानी/क्रिश आनंद वि.वि.
क्रिश शहा/अंगद ओबेरॉय 15-12;
तनिश बेलगलकर/रोनित जोशी वि.वि. तनिष/लियान 15-12;
अर्णव घई/रणवीर आनंद वि.वि.संचित दिवाडकर/अर्जुन राऊत 15-10;
आकाश ललवाणी/राहुल गुप्ता वि.वि.नित्या शहा/एरॉन थवानी 15-07;
32 ते 50 वयोगट:
टोनी शेट्टी/रवनीत वि.वि. पुनीत सामंत/पवन कटारिया 17-15;
इशांत रेगे/अनुज मेहता वि.वि.शरण सिंग/विशाल वाघानी 15-11;
रोहन दामले/निषाद चौघुले वि.वि.रोहन मलानी/प्रकाश कारिया 15-03;
अंकुश मोघे/संग्राम पाटील वि.वि. तुषार आसवानी/पूनम 15-11.

More Stories
पहिल्या पुना क्लब व पीवायसी पिकल बॉल स्पर्धेत आकाश धलवाणी व राहुल गुप्ता, ईशांत रेगे व अनुज मेहता, संग्राम पाटील व कल्पक पत्की यांना विजेतेपद
पहिल्या पुना क्लब व पीवायसी पिकल बॉल स्पर्धेत क्रिश शहा व अंगद ओबेरॉय, नित्या शहा व एरॉन थवानी यांची आगेकूच
दुसऱ्या पुना क्लब ओपन गोल्फ स्पर्धेत तिसऱ्या फेरीअखेर युवराज संधू आघाडीच्या स्थानावर