September 17, 2024

शाह नेअमत महेदवीया सोशल ट्रस्टतर्फे टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धा

पुणे,०७/०६/२०२३: शाह नेअमत महेदवीया सोशल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे आझम कॅम्पस पुणे येथे भव्य राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा “महेदी कप २०२३” चे आयोजन करण्यात आले होते.यात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र, तेलंगाना, राजस्थान आदी राज्यातून संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन माजी महापालिका आयुक्त अजिज कारचे यांनी केले. या स्पर्धेत परंडा संघाने बार्शी संघाचा पराभव करून विजेते पद पटकावत रोलिंग ट्रॉफी चे मानकरी ठरले.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे डॉ. हाजी जाकिर शेख व मुस्लिम बँकेचे संचालक लुकमान खान उपस्थित होते. तसेच ॲड. शाबिर खान, बबलू सय्यद, मशकुर शेख, बबलु शेख, हनिफ शेख, शेर अली शेख यांनी सदिच्छा भेट दिली व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेचे आयोजन शाह नेअमत महेदवीया सोशल ट्रस्ट चे अध्यक्ष इंजि.सादिक लुकडे, इकबाल आळंद, अय्युब लूकडे, अली चाबरु, अन्वर लांडगे, जंगबहादुर चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. तसेच या प्रसंगी समाजातील विविध मान्यवरांना महेदि अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.