February 12, 2025

दीक्षित लाईफस्टाईल हाफ मॅरेथॉन उत्साहात संपन्न

दि. १४ जानेवारी, २०२५ : दीक्षित जीवनशैली अंगिकारणाऱ्या नागरिकांचा सहभाग असलेली दीक्षित लाईफस्टाईल हाफ मॅरेथॉन नुकतीच पुण्यात अतिशय उत्साहात संपन्न झाली. वेद निर्मिती रिॲलिटी मुख्य प्रायोजक असलेल्या आणि ब्ल्यू ब्रिगेड स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत दीक्षित जीवनशैली अंगिकारणाऱ्या शेकडो नागरिकांनी ३ किमी, ५ किमी, १० किमी आणि २१ किमी प्रकारांत धावण्याच्या स्पर्धेत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.

असोसिएशन फॉर डायबेटीज अँड ओबेसिटी रिव्हर्सल अर्थात अडोरचे अध्यक्ष, ज्येष्ठ मधुमेह उपचार तज्ज्ञ व दीक्षित आहारपद्धतीचे प्रणेते डॉ. जगन्नाथ दीक्षित, अडोरचे विश्वस्त बाळासाहेब कदम, डॉ. वेदा नलावडे, अरुण नावगे, संजय मोरे, स्पर्धेचे मुख्य प्रायोजक वेद निर्मिती रिॲलिटीचे गणेश जरांडे, इन्फोसिसचे उपाध्यक्ष प्रवीण कुलकर्णी, पोलीस उपायुक्त संतोष बांगर, रंजन कुमार शर्मा आणि दीक्षित जीवनशैलीच्या माध्यमातून मधुमेह मुक्ती मिळवलेल्या संदीप जोशी व इतर अनुयायांच्या उपस्थितीत मॅरेथॉनला सुरुवात झाली.

स्पर्धेअंतर्गत संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये झुंबा तसेच मकरंद टिल्लू यांचा हास्य योग आदींचा समावेश होता. या प्रसंगी डॉ. दीक्षित यांनी जीवनशैली बाबत थोडक्यात माहिती देऊन मधुमेही व्यक्तींना अभियानाच्या जंगली महाराज रस्त्यावरील मोफत केंद्राला भेट देण्याचे आवाहन केले. सर्व कार्यक्रम आरजे तरुण यांच्या सूत्र संचलनाने उत्साहात पार पडले. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अनेक शहरांमधून तब्बल ४००० नागरिक या स्पर्धेत सहभागी झाले होते. ज्यामध्ये १६०० हून अधिक महिलांचा समावेश होता.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –

२१ किमी विभाग
पुरुष (संयुक्त) – प्रथम क्रमांक – दीपक कुमार
महिला (संयुक्त) – प्रथम क्रमांक – सयुरी दळवी
पुरुष (वय वर्षे ४० पर्यंत) – प्रथम क्रमांक – दीपक कुमार
महिला (वय वर्षे ४० पर्यंत) – प्रथम क्रमांक – लावण्या ममार्डे
पुरुष (वय वर्षे ४०- ५०) – प्रथम क्रमांक – रामचंद्र जाधव
महिला (वय वर्षे ४०- ५०) – प्रथम क्रमांक – सयुरी दळवी
पुरुष (वय वर्षे ५० पेक्षा जास्त) – प्रथम क्रमांक – सुनील महाजन
महिला (वय वर्षे ५० पेक्षा जास्त) – प्रथम क्रमांक – वृंदा शेगुरी
पेसर पुरुष – प्रथम क्रमांक – डॉ. सतीश मंडलिक
पेसर महिला – द्वितीय क्रमांक – मनीषा श्रीवास्तव

१० किमी विभाग
पुरुष (संयुक्त) – प्रथम क्रमांक – विकास इंगळे
महिला (संयुक्त) – प्रथम क्रमांक – पद्मा कारंडे
पुरुष (वय वर्षे ४० पर्यंत) – प्रथम क्रमांक – विकास इंगळे
महिला (वय वर्षे ४० पर्यंत) – प्रथम क्रमांक – पद्मा कारंडे
पुरुष (वय वर्षे ४० ते ५० पर्यंत) – प्रथम क्रमांक – प्रशांत शिराहट्टी
महिला (वय वर्षे ४० ते ५० पर्यंत) – प्रथम क्रमांक – ललिता तोमर
पुरुष (वय वर्षे ५० च्या पुढे) – प्रथम क्रमांक – सतीश गाडेवार
महिला (वय वर्षे ५० च्या पुढे) – प्रथम क्रमांक – नीतू राणी
पेसर पुरुष – प्रथम क्रमांक – गौरव कुबेर

५ किमी विभाग
पुरुष (संयुक्त) – प्रथम क्रमांक – मोहित यादव
महिला (संयुक्त) – प्रथम क्रमांक – सानिका मुरकुटे
पुरुष (वय वर्षे ४० पर्यंत) – प्रथम क्रमांक – मोहित यादव
महिला (वय वर्षे ४० पर्यंत) – प्रथम क्रमांक – सानिका मुरकुटे
पुरुष (वय वर्षे ४० ते ५०) – प्रथम क्रमांक – उत्तमपुरी गोस्वामी
महिला (वय वर्षे ४० ते ५०) – प्रथम क्रमांक – आभा शर्मा
पुरुष (वय वर्षे ५० च्या पुढे) – प्रथम क्रमांक – डॉ. देवेंद्र जाधव
महिला (वय वर्षे ५० च्या पुढे) – प्रथम क्रमांक – मनीषा वाणी