June 14, 2024

द पूना क्लब – वेकफिल्ड वार्षिक दुहेरी टेनिस स्पर्धेचे आयोजन

पुणे, 8 एप्रिल, 2023 : पूना क्लब यांच्या वतीने आयोजित द पूना क्लब – वेकफिल्ड(Weikfield)वार्षिक दुहेरी टेनिस स्पर्धेत क्लबच्या 60हुन अधिक टेनिसपटूंनी सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा पूना क्लब टेनिस कोर्ट येथे रविवार, 9 एप्रिल 2023 रोजी रंगणार आहे.
पूना क्लबचे क्रीडा विभागाचे चेअरमन अमेय कुलकर्णी यांनी सांगितले की, स्पर्धेचे उदघाटन पूना क्लबचे अध्यक्ष सुनील हांडा आणि वेकफिल्ड इंडस्ट्रीजच्या चेअरमन आश्विनी मल्होत्रा यांच्या हस्ते होणार आहे. यापुढे वार्षिक स्वरूपात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्या खेळाडूंना फिरता चषक आणि आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेमुळे क्लबमधील सदस्यांमध्ये युवा तसेच प्रौढ खेळाडूंमध्ये टेनिस खेळण्याविषयी आणखी उत्साह वाढेल अशी आशा आहे.
स्पर्धेच्या संयोजन समितीमध्ये क्रीडा विभागाचे चेअरमन अमेय कुलकर्णी, टेनिस विभागाच्या समितीचे सदस्य विराफ देबू, मुख्य प्रायोजक आश्विनी मल्होत्रा यांचा समावेश आहे.