पुणे, 8 मे 2025: एज इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट व बीव्हीसीआय यांच्या तर्फे दुसऱ्या कमिशनर्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर 10 व 11 मे
2025 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना एज इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटचे संचालक अनिकेत सोमण यांनी सांगितले कि, या स्पर्धेच्या माध्यमातून अधिकाऱयांची तंदरुस्ती, खिलाडूवृत्ती या भावनेने, आणि आमची संघटना व सरकारी संस्था यांच्यातील संबंध अधिक दृढ व्हावेत, या हेतूने या मैत्रीपूर्ण कमिशनर्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. विशेष म्हणजे प्रत्येक संघात 5 क्लास वन अधिकाऱ्यांचा समावेश
असणार आहे.
बीव्हीसीआय कार्याध्यक्ष रणजीत मोरे आणि सचिव सुधीर कुलकर्णी म्हणाले की, स्पर्धेत इन्कम टॅक्स टायगर्स(संघमालक सुहाना मसालेवाले), जीएसटी जायंट्स रिझोल्युशन((संघमालक इनसॉल्व्हवंसी ग्रुप), पीएमसी टायटन्स(वेंकटेश बिल्डकॉन), ग्रामीण चॅलेंजर्स(मालपाणी ग्रुप), पोलीस वॉरियर्स (रावेतकर ग्रुप), चॅरिटी लिजेंड्स(राईज), कस्टम्स सुपर किंग्ज(केदार जाधव) आणि गतविजेते रेल्वे रॉयल्स(आदित इन्फ्रा) हे 8 संघ सहभागी झाले आहेत.
तसेच, हि स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक व आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, सामनावीर या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
More Stories
सातारा वॉरियर्स व पुणे वॉरियर्स संघाच्या सराव सत्राला प्रारंभ
पाचव्या पूना क्लब रॅकेट लीग 2025 स्पर्धेत वेकफील्ड डिलाइट्स, स्टॅश प्रो परमार ऑल स्टार्स, एचके पावरहाऊस संघांचे विजय
पाचव्या पूना क्लब रॅकेट लीग 2025 स्पर्धेत एएसआर स्ट्रायकर्स संघाचा दुसरा विजय