मुंबई, १० जून २०२५ : पुणे शहरातील कात्रज कोंढवा रस्त्याचे काम राज्य शासनाने १४० कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यानंतरही वर्षभरात पूर्ण झालेले नाही, याबाबत महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे आणि कामाच्या विलंबास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
या विषयावर विधानपरिषदेचे सदस्य आमदार योगेश टिळेकर यांनी ७ मार्च २०२५ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात “विशेष उल्लेखाद्वारे” प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर सभापती प्रा. शिंदे यांच्या दालनात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार योगेश टिळेकर, विधानमंडळाचे सचिव डॉ. विलास आठवले, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम (दूरदृष्य प्रणालीद्वारे), अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि नगरविकास उप सचिव प्रियांका छापवाले उपस्थित होते.
सन २०१८ मध्ये कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मंजूर झाले असले तरी, मागील सात वर्षांत हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे भूसंपादनाच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. शासनाकडून मागवलेल्या निधीपैकी १४० कोटी रुपये एक वर्षापूर्वी मिळाले, तरीही भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. निधी मिळूनही काम न होणे ही गंभीर बाब असून, दोषींवर कारवाई करावी आणि हे काम हिवाळी अधिवेशनापूर्वी पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे निर्देश सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
More Stories
पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना तातडीने योग्य प्रमाणात पाणी पुरवठा करा: महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे
महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना व शिक्षकांना १२९ सुट्ट्या; शैक्षणिक वर्ष १६ जूनपासून सुरू होणार
सर्व विभागांच्या समन्वयातून ‘आषाढी वारी’ यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश