July 24, 2024

नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या दोन फूटबॉल खेळाडूंची जर्मनीतील प्रशिक्षणासाठी निवड

पुणे, ८ मार्च २०२३ : महाराष्ट्र शासन व एफ.सी. बायर्न असोसिएशन( जर्मनी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा नुकतेच बालेवाडी क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या.  या स्पर्धेमध्ये लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचा संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.

या संघातील खेळाडूंचे कौशल्य पाहून संघातील यायम पोलिम व लायपा वालिम या दोन खेळाडूंची जर्मनी येथील पुढील प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. एफ.सी. बायर्न असोसिएशन ( जर्मनी) चे निवड प्रमुख मिथायस यांनी ही निवड केली आहे. हे दोन्ही विद्यार्थी ‘ईश्वरपुरम’ या पूर्वांचलातील विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या वसतीगृहातील नागालॅंडचे विद्यार्थी आहेत.

लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, ईश्वरपुरम वसतिगृहाचे अध्यक्ष विनीत कुबेर व प्रशिक्षक तानाजी पाटील यांनी या दोन्ही खेळाडूंचे भरभरून कौतुक केले, तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ईश्वरपुरम वसतीगृहात सध्या नागालॅंडचे २० व अरुणाचल प्रदेशचे १९ विद्यार्थी असून सर्वच विद्यार्थी लोकसेवा प्रतिष्ठानच्या शाळेत शिक्षण घेतात.