पुणे, ३ फेब्रुवारी २०२५ : पक्षाला जय महाराष्ट्र करणाऱ्यांची वाढती संख्या आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पुण्यात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वत: पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यावर ते काही शाखांना भेट देऊन शाखा प्रमुखांशी चर्चा करणार आहेत.
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी शहर शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवक यांची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीमध्ये ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तर दोन दिवसांच्या भेटीमध्ये शहरातील काही मान्यवरांची देखील भेट घेणार आहेत, अशी माहिती शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील आठपैकी एकाच जागा मिळाली. तेथेही पक्षाला यश आले नाही. त्यानंतर पाच नगरसेवकांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करीत भाजपचा झेंडा हाती घेतला. त्या पाठोपाठ माजी आमदार महादेव बाबर यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महिला पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी झाली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढीस लागली आहे.
यासर्व पाश्र्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी शहर प्रमुख मोरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काही पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी मोतोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पुणे शहर व जिल्हयात लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी केली. त्यावेळी ठाकरे यांनी आपण शाखा प्रमुख यांच्या पुण्यात येऊन भेटी घेऊन पक्षाची नेमकी स्थिती काय आहे, कशा पद्धतीने पक्षाचे काम सुरू आहे, यांची माहिती घेणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबरच काही मान्यवरांच्या देखील भेटी घेऊन चर्चा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेकडून तयारी सुरू करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
More Stories
पुणे: आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरवात…विद्यार्थ्यांचे औक्षण करून,साखर वाटून स्वागत
पुणे: राज्याचे माजी मंत्री तान्हाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण
अभिनेता राहुल सोलापूरकर यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य….