May 11, 2024

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक संघाची अँबिशियस क्रिकेट क्लबवर मात

पुणे, दि.26 नोव्हेंबर 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित व गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज प्रायोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत ओम भाबड (68धावा व 3-33) याने दोन्ही डावात मिळून केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने अँबिशियस क्रिकेट क्लब संघावर 9 गडी राखून विजय मिळवला.

बारणे क्रिकेट मैदानावरील दोन दिवसीय सामन्यात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाच्या आज 44 षटकात 7बाद 185धावापासून खेळ पुढे सुरू झाला. तत्पूर्वी काल अँबिशियस क्रिकेट क्लबचा पहिला डाव 43.5षटकात सर्वबाद 149धावावर कोसळला. याच्या व्हेरॉक संघाने 53.3 षटकात सर्वबाद 218 धावा केल्या. यात ओम भाबडने 59चेंडूत 14 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 68 धावा काढून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर कार्तिक शेवाळे नाबाद 45, सुश्रुत सावंत 28, नारायण डोके 23 यांनी धावा काढून संघाला 69 धावांची आघाडी मिळवून दिली. अँबिशियसच्या गणेश कालेल(5-64), समर्थ वाबळे(3-81), अर्जुन साळुंके(2-32) यांनी सुरेख गोलंदाजी केली.

दुसऱ्या डावात अँबिशियस क्रिकेट क्लब संघ 33.3 षटकात सर्वबाद 114धावाच करू शकला. यात प्रफुल्ल कानडे 37, गणेश कालेल 23 यांनी थोडासा प्रतिकार केला. व्हेरॉककडून नारायण डोके(3-12), ओम भाबड(3-33), सुश्रुत सावंत( 1-4) यांनी अचूक गोलंदाजी केली. विजयासाठी व्हेरॉकला 45 धावांची आवश्यकता होती. हे आव्हान 6.1 षटकात 1बाद 46धावा करून पुर्ण केले. यात ओम भाबड नाबाद 20, सुश्रुत सावंत नाबाद 6 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला.

डेक्कन जिमखाना मैदानावरील दोन दिवसीय लढतीत दुसऱ्या दिवशी विलास क्रिकेट क्लब संघाच्या आज 21 षटकात 3बाद 96धावापासून खेळ पुढे सूरू झाला. तत्पूर्वी काल डेक्कन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 68.1 षटकात सर्वबाद 324धावा केल्या. याच्या उत्तरात डेक्कनच्या साहिल कड 4-54 , वरद नवांगुल 2-41) यांच्या गोलंदाजीपुढे विलास क्रिकेट क्लबचा डाव 74 षटकात सर्वबाद 256धावावर संपुष्टात आला. यात तुषार राठोड 57, हरिओम काळे 45, अर्णव पुरोहित 36, अरबाज शेख 32, रौनक दुबे 24, राहुल वंजारी 23 यांनी धावा केल्या. डेक्कन जिमखाना संघाने पहिल्या डावात 68 धावांची आघाडी घेतली.

दुसऱ्या डावात डेक्कन जिमखाना संघाने 13 षटकात 7बाद 99धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल विलास क्रिकेट क्लबने दिवस अखेर 20 षटकात 6बाद 117धावा केल्या. दोन्ही संघातील सामना अनिर्णित राहिल्यामुळे पहिल्या डावातील आघाडीवर डेक्कन जिमखाना संघाने विजय मिळवला.

निकाल: पहिला डाव: डेक्कन जिमखाना मैदान:
डेक्कन जिमखाना: 68.1 षटकात सर्वबाद 324धावा वि.विलास क्रिकेट क्लब: 74 षटकात सर्वबाद 256धावा(तुषार राठोड 57(86,8×4,1×6), हरिओम काळे 45(46,7×4,1×6), अर्णव पुरोहित 36, अरबाज शेख 32, रौनक दुबे 24, राहुल वंजारी 23, साहिल कड 4-54 , वरद नवांगुल 2-41); डेक्कन जिमखाना संघाकडे पहिल्या डावात 68 धावांची आघाडी;

दुसरा डाव: डेक्कन जिमखाना:13 षटकात 7बाद 99धावा (जाईद शेख 42(23,6×4,2×6), साहिल कड 10, अरबाज शेख 3-59, तुषार राठोड -17) वि. विलास क्रिकेट क्लब: 20 षटकात 6बाद 117धावा(अर्णव पुरोहित नाबाद 41(49,4×4), हरिओम काळे 30, रौनक दुबे 16, तुषार राठोड 17, रिद्धेश भुरूक 3-23, सर्वेश सुर्वे 2-20); सामना अनिर्णित; पहिल्या डावातील आघाडीवर डेक्कन जिमखाना विजयी.

बारणे क्रिकेट मैदान:
पहिला डाव : अँबिशियस क्रिकेट क्लब : 43.5षटकात सर्वबाद 149धावा वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 53.3 षटकात सर्वबाद 218 धावा (ओम भाबड 68(59,14×4,1×6), कार्तिक शेवाळे नाबाद 45(85,6×4), सुश्रुत सावंत 28, नारायण डोके 23, गणेश कालेल 5-64, समर्थ वाबळे 3-81, अर्जुन साळुंके 2-32); व्हेरॉक संघाकडे 69 धावांची आघाडी;

दुसरा डाव: अँबिशियस क्रिकेट क्लब: 33.3 षटकात सर्वबाद 114धावा(प्रफुल्ल कानडे 37, गणेश कालेल 23, नारायण डोके 3-12, ओम भाबड 3-33, सुश्रुत सावंत 1-4) पराभुत वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 6.1 षटकात 1बाद 46धावा(ओम भाबड नाबाद 20, सुश्रुत सावंत नाबाद 6, समर्थ वाबळे 1-26);सामनावीर – ओम भाबड; व्हेरॉक संघ 9 गडी राखून विजयी.