June 24, 2024

अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने दूध डेअरींसाठी कार्यशाळा संपन्न

पुणे, 10 मे 2023: पुण्यातील दूध डेअरी व्यावसायिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने ‘व्हिटॅमिन ए आणि डी सह दुधाचे दृढीकरण’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले.

याप्रसंगी अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) अ. गो. भुजबळ, सहायक आयुक्त अनिल गवते, राजेंद्र काकडे, दुग्ध संवर्धन तांत्रिक तज्ज्ञ विवेक अरोरा आदी उपस्थित होते.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) ने मुख्य खाद्यपदार्थ गहू, तेल, दूध, दुहेरी फोर्टिफाइट मीठ आणि तांदूळ यांच्या फोर्टिफिकेशनसाठी मानके परिभाषिक केली आहेत. ही मानके भारत सरकारने ऑगस्ट २०१८ मध्ये राजपत्रित केली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सह आयुक्त श्री. भुजबळ म्हणाले, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र शासनाने राज्यात दूध फोर्टीफिकेशनला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला असून या संदर्भात विकास एजन्सी ही केएचपीटी आणि जीएआयएन सोबत भागीदारी करत आहे. त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये फूड फोर्टिफिकेशनबद्दल जाणीवजागृती केली आहे. याच अनुषंगाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या ३३ दूध डेअरीनी राज्यातील सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता दूध करण्याच्या हेतूने दूध फोर्टीफिकेशनचा अवलंब करण्यास स्वारस्य दाखवले आहे, असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.