May 19, 2024

पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप(14 वर्षांखालील)क्रिकेट स्पर्धेत यशवी संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पुणे, 8 मार्च 2023: पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप(14 वर्षांखालील)क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत यशवी संघाने जस क्रिकेट संघाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

डिझायर क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात आदित्य हिरेच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर यशवी संघाने जस क्रिकेट संघाचा 53 धावांनी पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना गुंजन सावंतच्या नाबाद 68 व ओम सानपच्या 60 धावांसह यशवी संघाने 50 षटकात 6 बाद 194 धावा केल्या. 194 धावांच्या आव्हानाचा सामना करताना आदित्य हिरे व ओम सानप यांच्या अचूक गोलंदाजीपुढे जस क्रिकेट संघ 47 षटकात 8बाद 141 धावांत गारद झाला. 10 धावात 4 गडी बाद करणारा आदित्य हिरे सामनावीर ठरला.

एस.के. कटारिया हायस्कूल क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात प्रणव शिंदेच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर पूना क्लब संघाने क्रिकेट नेक्स्ट अकादमी संघाचा 2 गडी राखून पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

यशवी: 50 षटकात 6 बाद 194 धावा (गुंजन सावंत नाबाद 68(115,5×4), ओम सानप 60(88,7×4), क्षितीज भालेराव 2-30) वि.वि जस क्रिकेट: 47 षटकात 8बाद 141 धावा(यशराज शिंदे 47(83), 2×4,1×6), ओम खुडे 24(40,5×4), व्यंकटेश कळमकर 16(18,2×4), आदित्य हिरे 4-10, ओम सानप 3-28) सामनावीर- आदित्य हिरे

यशवी संघ 53 धावांनी विजयी

क्रिकेट नेक्स्ट अकादमी : 30 षटकांत सर्वबाद 112 धावा(सिद्धांत बाफना नाबाद 42(49,7×4,1×6), किशोर भोसले 22(33,4×4), पार्थ पोतदार 2-9, समर्थ भोरे 2-19, अर्णव मधे 2-19, प्रणव शिंदे 2-37, हर्षवर्धन येसुगडे 1-5, अंश टिल्लू 1-8) पराभूत वि पूना क्लब: 26.1 षटकांत 8 बाद 116 धावा (वीर जैन 32(69,5×4), हर्षवर्धन येसुगडे 15(14, 3×4, हर्षवर्धन लडकत 3 -30, कपिल कांबळे 2-16, कृष्णा पांडे 2-29) सामनावीर- प्रणव शिंदे

पूना क्लब संघ 2 गडी राखून विजयी