July 27, 2024

पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप(14 वर्षांखालील)क्रिकेट स्पर्धेत यशवी संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे, 16 मार्च 2023: पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप(14 वर्षांखालील)क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत ओम सनप(103धावा) याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर यशवी संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा 22 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

विजडम क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यशवी संघाने 45 षटकात 9 बाद 220धावा केल्या. यामध्ये ओम सनपने  अफलातून खेळी करताना 97 चेंडूत16चौकारांच्या साहाय्याने 103 धावा केल्या. त्याला गुंजन सावंतने 59चेंडूत 6चौकारासह 32 धावा काढून साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 98 चेंडूत 93 धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. व्हेरॉककडून प्रतीक कडलक(3-50), आलोक लोढा(2-35),  अर्णव जगताप(1-30) यांनी सुरेख गोलंदाजी केली. 
 
याच्या उत्तरात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा डाव 43.4 षटकात सर्वबाद 198 धावावर संपुष्टात आला. यात ओम पाटील 56, प्रज्वल मोरे 44, अथर्व औटे 45, श्रेयस शिवरकर 13 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. यशवी संघाकडून महेश्वर वाघ(2-27), आदित्य हिरे(2-53), शौर्य गायकवाड(2-57), गुंजन सावंत(1-30) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 22 धावांनी विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी ओम सनप ठरला.  
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपुर्व फेरी: 
यशवी:45 षटकात 9 बाद 220धावा(ओम सनप 103(97,16×4), गुंजन सावंत 32(59,6×4), अभिनव गायकवाड 13, आर्यन भामरे 13, प्रतीक कडलक 3-50, आलोक लोढा 2-35, अर्णव जगताप 1-30) वि.वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 43.4 षटकात सर्वबाद 198धावा(ओम पाटील 56(82,6×4), प्रज्वल मोरे 44(85,4×4), अथर्व औटे 45(49,4×4), श्रेयस शिवरकर 13, महेश्वर वाघ 2-27, आदित्य हिरे 2-53, शौर्य गायकवाड 2-57, गुंजन सावंत 1-30);सामनावीर-ओम सानप; यशवी 22 धावांनी विजयी;