पुणे, 6 जानेवारी 2025- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पाचव्या दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत 12 संघांना आमंत्रित करण्यात आले आहे. ही स्पर्धा 8 ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत होणार असून पीवायसी हिंदू जिमखाना, नेहरू स्टेडियम, क्लब ऑफ महाराष्ट्र, बारणे क्रिकेट अकादमी, ब्रिलियंटस, डिव्हीसीए, विरांगणा क्रिकेट मैदान, शिंदे हायस्कूल मैदान, पुना क्लब मैदानावर स्पर्धेचे सामने होणार आहेत.
पाथ-वे फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत जाधव आणि सचिव सिद्धार्थ निवसरकर यांनी सांगितले की, या स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना, पुना क्लब, क्लब ऑफ महाराष्ट्र, दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी, कॅडन्स क्रिकेट अकादमी, मेट्रो क्रिकेट क्लब, स्टार क्रिकेट क्लब, विलास क्रिकेट क्लब, ब्रिलियंट्स स्पोर्टस अकादमी, पुनीत बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी(पीबीकेजे) आणि ऍबिशियस क्लब हे 12 संघ झुंजणार आहेत. ही स्पर्धा साखळी व सुपरलीग पध्दतीने होणार आहे. 12 संघांची तीन गटांमध्ये प्रत्येकी 4 संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. साखळी सामन्यांमधील प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपुर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. स्पर्धेला दोशी इंजिनिअर्स यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. सुधीर नाईक यांच्या स्मरणार्थ आशुतोष देशपांडे व राधिका देशपांडे यांनी या स्पर्धेला सह प्रायोजकत्व प्रदान केले आहे.
ते पुढे म्हणाले की, पाथ-वे फाउंडेशनच्या वतीने पाचव्या वर्षी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे सामने 50 षटकांचे होणार असून स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर यांना देखील आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये रोहित खडकीकर, आशुतोष सोमण, कुणाल मराठे यांचा समावेश आहे.
More Stories
पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना मैत्रीपूर्ण बॅडमिंटन लीग स्पर्धेत कटक्कर ईगल्स संघाला विजेतेपद
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला