October 14, 2025

पिंपरी चिंचवड परिवहन कार्यक्षेत्रातील 123 ऑटोरिक्षा स्टॅंण्डना मान्यता

पुणे दि . 12/06/2025: प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक, वाहतुक विभागातील अधिकारी, महानगरपालिका व रिक्षा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्षा स्टॅण्ड चे नव्याने सर्वेक्षण करुन नुकत्याच झालेच्या बैठकीमध्ये १२३ ऑटोरिक्षा स्टॅण्डच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

मान्यता देण्यात आलेल्या १२३ थांब्यांव्यतिरिक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आळंदी नगरपरिषद व देहुरोड कॅन्टोनमेंट बोर्ड यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या इतर अनधिकृत थांबे निष्कासित करण्याची तसेच अतिक्रमण हटवण्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.

तरी पिंपरी चिंचवड कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अन्य ठिकाणी रिक्षा थांबा आवश्यक असल्यास नागरिक, रिक्षा संघटना तसेच संबंधित विभाग यांनी कार्यालयाकडे पुढील १५ दिवसात अर्ज केल्यास विहित पध्दतीने संयुक्त सर्वेक्षण करुन नियमानुसार असे थांबे मंजुर करण्याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या स्तरावर यथायोग्य कार्यवाही करण्यात येईल असे, संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.