पुणे, 23 मार्च 2023: पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप(14 वर्षांखालील)क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत पूना क्लब संघाने स्पोर्टिव्ह स्पार्क्स संघाचा तर चंद्रोस संघाने आर्यनस् संघाचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.
व्हिजडम क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हर्षवर्धन येसुगडेच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पूना क्लब संघाने स्पोर्टिव्ह स्पार्क्स संघाचा 33 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना प्रणव शिंदेच्या नाबाद 33 व पार्थ पोतदारच्या 31 धावांसह पूना क्लब संघाने 33.5 षटकांत सर्वबाद 120 धावा केल्या. 120 धावांच्या आव्हानाचा सामना करताना हर्षवर्धन येसुगडे , प्रणव शिंदे व पार्थ पोतदार यांच्या अचूक गोलंदाजीपुढे स्पोर्टिव्ह स्पार्क्स संघ 21.5 षटकांत सर्वबाद 87 धावांत गारद झाला. 24 धावात 5 गडी बाद करणारा हर्षवर्धन येसुगडे सामनावीर ठरला.
वाळके स्पोर्ट्स मैदानावर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात वेदांत कानपिळेच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर चंद्रोस संघाने आर्यनस् संघाचा 30 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. पहिल्यांदा खेळताना युसूफ मुजावरच्या 25 व दीप पाटीलच्या 14 धावांसह चंद्रोस संघाने 37.2 षटकांत सर्वबाद 104 धावा केल्या. 104 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेदांत कानपिळे, दर्शिल वाघेला, सर्वेश वाघमारे व अर्जुन शेळके यांच्या अचूक गोलंदाजीने आर्यनस् संघाचा डाव 29.5 षटकात सर्वबाद 74 धावांत रोखला. 14 धावात 5 गडी बाद करणारा वेदांत कानपिळे सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्यपुर्व फेरी:
पूना क्लबः 33.5 षटकांत सर्वबाद 120 धावा (प्रणव शिंदे नाबाद 33(38,3×4,1×6), पार्थ पोतदार 31(42,5×4), पार्थ आर पांडे 4-15, सार्थ माळी 2-20, ध्रुविल रायथाथा 2- 36) वि.वि स्पोर्टिव्ह स्पार्क्स: 21.5 षटकांत सर्वबाद 87 धावा(तन्मय पाटील 13, शंतनू फते 13, हर्षवर्धन येसुगडे 5-24, प्रणव शिंदे 2-18, पार्थ पोतदार 2-25) सामनावीर- हर्षवर्धन येसुगडे
पूना क्लब संघ 33 धावांनी विजयी.
चंद्रोस: 37.2 षटकांत सर्वबाद 104 धावा (युसूफ मुजावर 25(56,4×4), दीप पाटील 14, आदर्श रावल 6-10, अर्णव पाटील 2-10, प्रद्युम्न कोळी 2-41) वि.वि आर्यनस्: 29.5 षटकात सर्वबाद 74 धावा (प्रद्युम्न कोळी 26, आदर्श रावल 17, वेदांत कानपिळे 5-14, दर्शिल वाघेला 2-18, सर्वेश वाघमारे 2-26, अर्जुन शेळके 1-6) सामनावीर- वेदांत कानपिळे
चंद्रोस संघ 30 धावांनी विजयी.
More Stories
भाषिक कौशल्यातून रोजगाराच्या अनेक संधी: प्रो. पराग काळकर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हिंदी दिवस सोहळा आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रम संपन्न
केंद्र सरकारच्या सहकारी संस्थांबाबतच्या नवीन कायद्याची माहिती घेऊन विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्यवसाय उभे करावेत – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील