पुणे, २३ एप्रिल २०२५ ः पावसाळ्यात शहरात २०१ ठिकाणी पाणी तुंबून ही ठिकाणे धोकादायक होतात, त्यामुळे या ठिकाणी महापालिकेने पाणी निचरा होण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. ही कामे २१ मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक झाली. त्यामध्ये पाणी तुंबणाऱ्या जागांसंदर्भात चर्चा करण्यात आली. महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग, मलनिःसारण विभाग, क्षेत्रीय कार्यालये आणि पोलिसांकडून शहरातील पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यात २०१ ठिकाणांचा समावेश आहे. केंद्र सरकारकडून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनेत महापालिकेला निधी मिळाला आहे, त्यातून जी कामे सुरु आहेत. त्यापैकी २०१ पैकी २१ ठिकाणांचा समावेश आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनेतून सध्या ६६ ठिकाणी कामे सुरु आहेत. अनेक ठिकाणी पावसाळी गटार टाकणे, कलव्हर्ट बांधणे, बॉक्स पावसाळी गटार टाकणे ही कामे सुरु आहेत. यातील काही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील. तर कलव्हर्ट बांधण्याचे काम लगेत पूर्ण होणार नाही अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

More Stories
पुणे ग्रँड टूरनिमित्त १९ जानेवारीला पुण्यातील प्रमुख रस्त्यावरील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला