September 14, 2024

तिसरी ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा

पुणे, १९ जुनः एजीएएस मॅनेजमेंट तर्फे कै. अपर्णा चंद्रशेखर ओक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित तिसर्‍या ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत डिझायनर इलेव्हन आणि ग्लोबल वॉरीयर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत जगदीश सुरे याच्या नाबाद १०७ धावांच्या खेळीमुळे डिझायनर इलेव्हनने गेम स्विंगर्स संघाचा ६ धावांनी पराभव केला. धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात डिझायनर इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना २१२ धावांचा डोंगर उभा केला. जगदीश सुरे याने ६४ चेंडूत १२ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद १०७ धावांची स्फोटक खेळी केली. भागिदारी केली. त्याला आदित्य बाकरे याने नाबाद ७१ धावा काढून सुरेख साथ दिली. या दोघांनी तिसर्‍या गड्यासाठी ६४ चेंडूत १२८ धावांची अखंडीत भागिदारी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना गेम स्विंगर्सने २०६ धावा चोपल्या. संघाच्या संकेत जोशी (७६ धावा), रणजीत कुलकर्णी (५६ धावा) आणि अभय चौगुले (नाबाद ५६ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. पण विजयासाठी त्यांना ६ धावा कमी पडल्या.

सईश शिंदे आणि कृष्णा चौधरी यांच्या कामगिरीच्या जोरावर ग्लोबल वॉरीयर्स संघाने ब्राईट इलेव्हनचा ५९ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ग्लोबल वॉरीयर्स संघाने १९६ धावा धावफलकावर लावल्या. कृष्णा चौधरी याने ८० धावांची खेळी केली. अतुल शेलके (३० धावा) आणि अजय पाटील (२७ धावा) यांनीही योग्य साथ दिली. या आव्हानासमोर ब्राईट इलेव्हनचा डाव १३७ धावांवर मर्यादित राहीला. निलेश माळी याने ६१ धावांची खेळी केली. गोलंदाजीमध्ये सईश शिंदे (३-१८), राकेश मते (२-१४) आणि शाम यादव (२-२१) यांनी अचूक गोलंदाजी करत संघाचा विजय सोपा केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
डिझायनर इलेव्हनः २० षटकात २ गडी बाद २१२ धावा (जगदीश सुरे नाबाद १०७ (६४, १२ चौकार, ५ षटकार), आदित्य बाकरे नाबाद ७१ (३५, ९ चौकार, ३ षटकार) वि.वि. गेम स्विंगर्सः २० षटकात ४ गडी बाद २०६ धावा (संकेत जोशी ७६ (४४, ८ चौकार, ४ षटकार), रणजीत कुलकर्णी ५६ (३८, ९ चौकार, २ षटकार), अभय चौगुले नाबाद ५६ (२८, ७ चौकार, २ षटकार), आदित्य बाकरे २-२८); सामनावीरः जगदीश सुरे;

ग्लोबल वॉरीयर्सः २० षटकात ९ गडी बाद १९६ धावा (कृष्णा चौधरी ८० (४७, ७ चौकार, ६ षटकार), अतुल शेलके ३०, अजय पाटील २७, मिहीर ओक ३-३१, निनाद फाटक २-४३) वि.वि. ब्राईट इलेव्हनः १७.१ षटकात १० गडी बाद १३७ धावा (निलेश माळी ६१ (३७, ९ चौकार, २ षटकार), नितीन श्रीनिवास २९, सईश शिंदे ३-१८, राकेश मते २-१४, शाम यादव २-२१); सामनावीरः सईश शिंदे;