पुणे, 17 मे 2024: मंदार वाकणकर टेनिस अकादमी व गोल्ड लिफ यांच्या व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली
तर्फे टीपीएल – पीएमडीटीए खुल्या टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 18 ते 19 मे 2024 या कालावधीत स.प.महाविद्यालय टेनिस कोर्ट येथे होणार आहे.
स्पर्धेत शहरातून 60 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून हि स्पर्धा पुरूष व महिला एकेरी गट, 35 वर्षांवरील पुरुष व खुला दुहेरी गटात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धा संचालक मंदार वाकणकर यांनी दिली.
More Stories
पृथ्वी शॉ महाराष्ट्राच्या संघात सामील; भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने मोठा निर्णय
पाचव्या पीवायसी – रिअल्टी सेव्हन चेस लीग स्पर्धेत ७२ खेळाडू सहभागी
सातारा वॉरियर्स व पुणे वॉरियर्स संघाच्या सराव सत्राला प्रारंभ