पुणे, २४ एप्रिल २०२५: जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या एकूण ६५७ पर्यटकांनी पुणे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असून त्यापैकी १४८ पर्यटक २७ एप्रिल २०२५ पर्यंत पुण्यात परतणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
आज सकाळी १० वाजता ११ पर्यटक विमानाने पुण्यात दाखल झाले असून आणखी १९ प्रवासी आजच विमानाने येणार आहेत. याशिवाय, २५ एप्रिल रोजी ७७, २६ एप्रिल रोजी १२ प्रवासी विमानाने पुण्यात दाखल होतील. २७ एप्रिल रोजी २९ पर्यटक रेल्वेने परत येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे पर्यटकांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत असून त्यांच्याकडून आवश्यक माहिती गोळा करण्याची कार्यवाही सुरू आहे, असेही डुडी यांनी सांगितले. प्रशासन सर्व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी दक्ष आहे आणि आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

More Stories
पुणे : महिला दिनापासून पुणे मेट्रोमध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष राखीव जागा
दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील १२८ नागरिक सुखरूप परत
पुणे : रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३५० जणांचे रक्तदान; नववे वार्षिक शिबिर उत्साहात संपन्न