पुणे, २३ एप्रिल २०२५: पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत कार्यालयाच्या आवारात वाहन मालक किंवा चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी तडजोड शुल्क, मोटार वाहन कर, पर्यावरण कर भरुन लिलावाच्या तारखेपर्यंत सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्यांपैकी १४८ वाहनांच्या प्रकरणांमध्ये वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी कार्यालयाशी संपर्क साधून वाहने सोडवून घ्यावीत. या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया बुधवार, ३० एप्रिल आणि शुक्रवार, २ मे २०२५ होणार आहे. या वाहनांची यादी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, संत नगर, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड कार्यालय आणि तळेगाव व राजगुरुनगर (खेड) एसटी आगाराच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे.
अधिक माहितीकरीता https://eauction.gov.in आणि www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, संत नगर, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड ०२०-२७२३२८२८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.
More Stories
Pune: चाकण भागातील सव्वादोनशे अतिक्रमणावर हातोडा
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १४१ शाळांमध्ये आफ्टर-स्कूल मॉडेलची सुरुवात
PCMC: ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन मालमत्ता कर भरा आणि मिळवा ४ टक्के सवलत!