January 16, 2026

Pune: हनीट्रॅप प्रकरणात महिला वाहक निलंबित; रखवालदारावरही कारवाई

पुणे, ७ ऑक्टोबर २०२५ : पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन आगारातील महिला वाहक सुरेखा बळीराम भालेराव (वाहक क्र. ६४३०) यांच्यावर हनीट्रॅपच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्यानंतर त्यांना चौकशीअंती तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात १७ सप्टेंबर रोजी भालेराव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०८ (२), ३०८ (६) आणि ३०८ (७) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आर्थिक फायद्यासाठी रोहित कदम, मनोज सुकणे आणि भगवान इबिते यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्यांच्या अटकेची कारवाईही केली आहे.

या गंभीर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएल प्रशासनाने त्यांना तत्काळ निलंबित केले आहे.
दरम्यान, रखवालदार अक्षय अनिल देशपांडे हे वारंवार विनापरवानगी गैरहजर राहिल्याने त्यांनाही चौकशीदरम्यान निलंबित करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.