October 15, 2025

Pune: भाजपच्या वतीने कोंढव्यात आयुष्यमान भारत कार्डचे वाटप

पुणे, 08/10/2025: भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोंढवा भागात आयुष्यमान भारत योजनेच्या कार्ड चे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ज्योती हॉटेल चौक येथे आयोजित या कार्यक्रमात दोन दिवसात पाच हजार नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात आभा योजने बरोबरच आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशनकार्ड सह अन्य शासकीय योजनांचे लाभ देण्यात आले.

या उपक्रमाबद्दल बोलताना अली दारूवाला म्हणाले, कोंढव्या सारख्या मुस्लिम बहुल भागात आता भाजप आपले पाय रोवत आहे. मोदी सरकारच्या योजनांचा सामान्य जनतेला लाभ घेता यावा हा या शिबिराचा हेतू आहे. आम्ही भाजप आणि मोदीजी यांनी केलेली विकास कामे, योजना यांचा लाभ मुस्लिम समाजाला मिळावा आणि भाजप सोबत मुस्लिम जनाधार वाढवा यासाठी प्रयत्न करत आहोत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्पाल पारगे, प्रविण जगताप, अमर गव्हाणे, खलील फारूखी, नईम शेख मांडववाले, समीर शफी पठाण आदी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.