पुणे, 15 ऑक्टोबर 2025: एम्पॉवर हर फाउंडेशनतर्फे आणि पीएमडीटीए, ऍथलेटिक्स बीएनबी,भारत स्पोर्ट्स इव्हॉल्युशन, मायमेंटल कोच, योल्कशायर आणि पॅरेंट्स ग्रुप यांच्या सहकार्याने आयोजित दुसऱ्या ‘एआयटीए-एमएसएलटीए एक लाख रकमेची अखिल भारतीय महिला मानांकन टेनिस स्पर्धेत एकेरीत महाराष्ट्राच्या आकृती सोनकुसरे, कर्नाटकच्या दिशा बेहेरा यांनी मानांकित खेळाडूंना परभावाचा धक्का देत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पाषाण येथील अनिकेत वाकणकर टेनिस अकादमीच्या टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत एकेरीत कर्नाटकच्या सहाव्या मानांकित दिशा बेहेरा हिने अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या लालित्या कल्लुरीचा टायब्रेकमध्ये 2-6, 6-4, 7-6(5) असा संघर्षपूर्ण पराभव केला. महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत आकृती सोनकुसरे हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत तिसऱ्या मानांकित आंध्रप्रदेशच्या चंदना पोतुगरीचा 6-4, 7-6(9) असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. दुसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या सोनल पाटीलने आठव्या मानांकित तेलंगणाच्या थानिया गोगुलामंडाचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्या डेनिका फर्नांडोने गुजरातच्या सातव्या मानांकित आरुषी रावळवर 6-0, 6-3 असा विजय मिळवला.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत गुजरातच्या आरुषी रावळने आंध्रप्रदेशच्या चंदना पोतुगरीच्या साथीत कर्नाटकच्या नियामिका बालाजी व सोनाशी भटनागर यांचा 6-0, 2-6, 10-4 असा तर, गोव्याच्या सायशा तनेजा व छत्तीसगढच्या आनंदिता शर्मा या जोडीने तेलंगणाच्या सोक्ष्या गड्डम व श्रेया गुप्ता यांचा 3-6, 7-5, 11-9 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्यपूर्व फेरी: महिला:
दिशा बेहेरा(6)(कर्नाटक)वि.वि.लालित्या कल्लुरी(1)(महाराष्ट्र) 2-6, 6-4, 7-6(5);
सोनल पाटील(2)(महाराष्ट्र)वि.वि. थानिया गोगुलामंडा(8)(तेलंगणा)6-3, 6-2;
डेनिका फर्नांडो(4)(महाराष्ट्र) वि.वि. आरुषी रावळ(7)(गुजरात) 6-0, 6-3;
आकृती सोनकुसरे(महाराष्ट्र) वि.वि.चंदना पोतुगरी(3)(आंध्रप्रदेश)6-4, 7-6(9);
दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी:
आरुषी रावळ(गुजरात)/ चंदना पोतुगरी(आंध्रप्रदेश)वि.वि.नियामिका बालाजी(कर्नाटक)/सोनाशी भटनागर 6-0, 2-6, 10-4;
सायशा तनेजा(गोवा)/आनंदिता शर्मा(छत्तीसगढ)वि.वि.सोक्ष्या गड्डम(तेलंगणा)/श्रेया गुप्ता(तेलंगणा) 3-6, 7-5, 11-9;
More Stories
पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना मैत्रीपूर्ण बॅडमिंटन लीग स्पर्धेत कटक्कर ईगल्स संघाला विजेतेपद
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला