October 20, 2025

पीवायसी व दोशी इंजिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील खेळाडूंसाठी 16 वर्षाखालील मुलांसाठी क्रिकेट निवड चाचणीचे आयोजन

पुणे, 19 ऑक्टोबर 2025: पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने व दोशी इंजिनियर्स यांच्या सहकार्याने राज्यभरातील खेळाडूंसाठी पीवायसी क्रिकेट अकादमीची येत्या 26 ऑक्टोबर 2025 रोजी 16 वर्षाखालील मुलांसाठी क्रिकेटची निवड चाचणी घेण्यात येणार आहे.

याविषयी पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे आणि सह सचिव सारंग लागू, दोशी इंजिनियर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित दोशी यांनी सांगितले की, पुण्यातील नामांकित क्लबपैकी एक असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने राज्यभरातील गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंसाठी क्रिकेटची निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीतून निवड झालेल्या खेळाडूंना माजी रणजीपटू निरंजन गोडबोले, इंद्रजीत कामतेकर, पराग शहाणे व चारुदत्त कुलकर्णी या अनुभवी प्रशिक्षकांतर्फे वर्षभर मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून पुण्यात होणाऱ्या विविध स्पर्धातही त्यांना सहभागी होता येणार आहे. विशेष म्हणजे या निवड झालेल्या खेळाडूंना प्रशिक्षक, फिजिओ, आहारतज्ञ यांचेदेखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

याशिवाय 14 वर्षांवरील ते 16 वर्षांखालील या वयोगटातील खेळाडूंना या निवड चाचणीत सहभागी होता येणार आहे. या निवड चाचणी संदर्भात खेळाडूंनी 26 तारखेला सकाळी साडेआठ वाजता पीवायसीच्या मैदानावर निरंजन गोडबोले यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

तसेच, या निवड चाचणीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंना नावनोंदणी करणे बंधनकारक असून नावनोंदणी व अधिक माहितीसाठी श्री निरंजन गोडबोले, मोबाईल क्रमांक 9823023952 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.