January 16, 2026

सैनिक कल्याण विभागात लिपिक टंकलेखक (गट-क) पदांची भरती; ऑनलाईन अर्ज २६ नोव्हेंबरपर्यंत

पुणे, २0 नोव्हेंबर २०२५: सैनिक कल्याण विभाग तसेच त्याच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात लिपिक टंकलेखक (गट-क) पदांसाठी केवळ माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यापैकी दिव्यांग उमेदवारांसाठी एक पद राखीव असून 40 टक्के अथवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या पात्र उमेदवारांची दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार आणि कार्यक्षमतेच्या निकषांनुसार निवड करण्यात येणार आहे.

भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएनच्या माध्यमातून पार पाडली जाणार असून अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. इच्छुक उमेदवारांनी www.mahasainik.maharashtra.gov.in
या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 नोव्हेंबर 2025, रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे.

भरतीशी संबंधित सर्व अटी, पात्रता निकष आणि सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे एस. दै. (नि.) यांनी स्पष्ट केले आहे.