पुणे, २२ नोव्हेंबर २०२५ : शहरातील अनधिकृत बांधकामांवर कठोर भूमिका घेत पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कात्रज, कोंढवा आणि मुंढवा परिसरात व्यापक कारवाई सुरू केली आहे. या मोहीमेअंतर्गत अनेक अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटवण्यात येत आहेत.
गंगाधाम–कात्रज रोडवरील स्वामी समर्थ नगर परिसरातील महावीर चौकाजवळील काकडे वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी सकाळीच पथकासह परिसरात दाखल झाले. त्यांनी अनधिकृत बांधकामे पाडण्याची व अतिक्रमणे हटवण्याची प्रक्रिया तातडीने सुरू केली.
कारवाईदरम्यान परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात ठेवत संपूर्ण कारवाई सुरक्षित वातावरणात पार पाडली.
महापालिकेच्या या मोहिमेमुळे संबंधित भागातील अतिक्रमणांवर कडक कारवाई होत असून, पुढील काही दिवसांमध्ये इतर भागांमध्येही अशीच मोहीम राबवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही