पुणे, ८ जानेवारी २०२६ : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भविष्यातील सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडण्यासाठी भाजप पुणे शहरतर्फे ‘संवाद पुणेकरांशी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार, ११ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता एरंडवणे येथील शुभारंभ लॉन्समध्ये पुणेकरांशी थेट संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक पुणेकरांच्या वतीने मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेणार आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवर पुणेकर यावेळी उपस्थित राहणार असून, हा संवाद शहरातील सर्व प्रभागांमध्ये लाईव्ह स्क्रीनद्वारे दाखवण्यात येणार आहे. या माध्यमातून सुमारे पाच लाखांहून अधिक नागरिक कार्यक्रमाचे साक्षीदार ठरणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘घर चलो’ अभियानाचाही शुभारंभ होणार असून, पुढील दोन दिवसांत भाजपचा संकल्पनामा पुण्यातील दहा लाख घरांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पुणे हे देशाला दिशा देणारे शहर असून वारसा, पर्यावरण, उद्योग आणि नागरी जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी दूरदृष्टी असलेले नेतृत्व आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संवादातून पुण्याच्या प्रश्नांवरील स्पष्ट रोडमॅप आणि शहराच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन मांडणार आहेत, असे राजेश पांडे यांनी सांगितले.

More Stories
Pune: अखेर मतमोजणी केंद्र ठरली, महापालिकेकडून केंद्राची माहिती जाहीर
भाजप हरणार म्हणून मोहोळ घाबरले – रोहित पवार
Pune: पुणे फस्ट चा काँग्रेसचा नारा – जाहीरनाम्यात केल्या तरतुदी