पुणे, ९ जानेवारी २०२६ : महापालिका निवडणूकीसाठीचे मतदार १५ जानेवारीला होणार त्यानंतर लगेच १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठीच्या केंद्राची अखेर महापालिका प्रशासनाकडून घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियोजन करण्य़ात आले असून संबंधित प्रभागांतील क्रीडा संकुले, शाळा, महाविद्यालये तसेच सांस्कृतिक केंद्रांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानानंतर सर्व मतपेट्या मतमोजणीच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ‘स्ट्राँग रूम’मध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. महापालिकेचे उपायुक्त अरविंद माळी यांनी ही माहिती दिली.
—————
अशी असतील मतदान केंद्र
* बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागांची मतमोजणी :
सारसबाग येथील बाबूराव सणस मैदानावरील कबड्डी मैदान
* सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागांची मतमोजणी :
वडगाव येथील शरदचंद्र पवार अकॅडमी ऑफ ई-लर्निंग
* कसबा–विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागांची मतमोजणी :
टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल
* धनकवडी–सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागांची मतमोजणी :
क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारातील पत्रा शेड
* घोले रस्ता–शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागांची मतमोजणी :
शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाचे मैदान
* कोंढवा–येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागांची मतमोजणी :
कात्रज–कोंढवा रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज ई-लर्निंग स्कूल
* वानवडी–रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागांची मतमोजणी :
वानवडी येथील एसआरपीएफ क्रमांक एकमधील जिजाऊ मंगल कार्यालय
* हडपसर–मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागांची मतमोजणी :
रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयातील कर्मवीर सभागृह
* येरवडा–कळस–धानोरी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागांची मतमोजणी :
खराडी येथील राजाराम पठारे स्टेडियम
* औंध–बाणेर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागांची मतमोजणी :
बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल
* कोथरूड–बावधन क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागांची मतमोजणी :
कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठ
* भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागांची मतमोजणी :
रामोशी गेट पोलिस चौकीजवळील रफी अहमद किडवई माध्यमिक महाविद्यालय
* वारजे–कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागांची मतमोजणी :
पौड फाटा येथील पं. दीनदयाळ उपाध्याय शाळा
* ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागांची मतमोजणी :
कोरेगाव पार्क येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक
* नगर रस्ता–वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागांची मतमोजणी :
क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारातच

More Stories
भाजप हरणार म्हणून मोहोळ घाबरले – रोहित पवार
अभिनेत्री गिरीजा ओक फडणवीसांना करणार बोलते: पुण्याचे विकास व्हिजन मांडणार
Pune: पुणे फस्ट चा काँग्रेसचा नारा – जाहीरनाम्यात केल्या तरतुदी