January 19, 2026

पुण्यातील १२ टक्के मतदारांचा ‘नोटा’कडे कल

पुणे, १९ जानेवारी २०२६: पुणे महापालिका निवडणुकीत मतदारांनी यंदा उमेदवारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. एकूण १८ लाख ३२ हजार मतदान झाले असताना, त्यापैकी तब्बल २ लाख १६ हजार २४४ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला असून ही टक्केवारी सुमारे ११.८० टक्के आहे. ही आकडेवारी शहराच्या राजकारणासाठी धक्कादायक मानली जात आहे.

सरासरी प्रत्येक प्रभागात हजारोंच्या संख्येने मतदारांनी उमेदवारांना नाकारत ‘नोटा’ला पसंती दिली आहे. काही प्रभागांमध्ये ही संख्या तीन ते आठ हजारांच्या पुढे गेल्याचे चित्र आहे. यावरून उमेदवारांची निवड, पक्षीय अंतर्गत राजकारण, तसेच जबरदस्तीने लादलेले उमेदवार याविरोधात मतदारांनी मतदानाद्वारे निषेध नोंदविल्याचे स्पष्ट होते.

राजकीय पक्षांकडून ‘इलेक्टेबल मेरिट’चा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात उमेदवार निवड प्रक्रियेत मतदारांचा विचार डावलला जात असल्याचा आरोप बळावत आहे. पक्षांतर्गत गटबाजी, जुने वाद, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि स्थानिक पातळीवर काम न करणाऱ्या उमेदवारांमुळे मतदारांचा भ्रमनिरास झाल्याचे ‘नोटा’च्या वाढत्या आकडेवारीतून दिसून येते.

विशेष म्हणजे, काही प्रभागांमध्ये विजयी उमेदवारांच्या मतांपेक्षा ‘नोटा’ची मते अधिक किंवा तुल्य असल्याने राजकीय पक्षांसाठी ही गंभीर इशाराची घंटा मानली जात आहे. जवळपास प्रत्येक आठपैकी एक मतदाराने उमेदवार नाकारल्याने पुण्यातील राजकारणात आत्मपरीक्षणाची वेळ आल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणूक ही केवळ जिंकण्याची लढाई नसून जनतेचा विश्वास मिळवण्याची प्रक्रिया आहे, हे यंदाच्या पुणे महापालिका निवडणुकीत ‘नोटा’ने ठळकपणे अधोरेखित केले आहे.

प्रभाग निहाय झालेले ‘नोटा’ला पसंती देणाऱ्या मतदारांची संख्या
प्रभाग ०१ – ७९९०
प्रभाग ०२ – ५६६८
प्रभाग ०३ – ४२९४
प्रभाग ०४ – ५१८४
प्रभाग ०५ – ५३१८
प्रभाग ०६ – ३३१४
प्रभाग ०७ – ४८०४
प्रभाग ०८ – ७३७१
प्रभाग ०९ -११५७६
प्रभाग १० – ५१८८
प्रभाग ११- ५१८८
प्रभाग १२ – ६१४०
प्रभाग १३ – ३२६५
प्रभाग १४ – ३९७७
प्रभाग १५ – ४८४३
प्रभाग १६ – ३९३७
प्रभाग १७ – ३३७५
प्रभाग १८- २७४१
प्रभाग १९ – २५५३
प्रभाग २० – ५४९३
प्रभाग २१ – ३९८५
प्रभाग २२ – ३२४६
प्रभाग २३ – ४६९९
प्रभाग २४ – ४८४४
प्रभाग २५ – ६६३१
प्रभाग २६ – ४०४५
प्रभाग २७ – ५८३१
प्रभाग २८ – ५१५५
प्रभाग २९ – ६२१०
प्रभाग ३० – ५३१६
प्रभाग ३१- ६४०६
प्रभाग ३२ – ५३१६

प्रभाग ३३ – ७२१५
प्रभाग ३४ – ७४६१
प्रभाग ३५ – ३८५८
प्रभाग ३६ – ५१८८
प्रभाग ३७ -५१८१
प्रभाग ३८ – ८९३१
प्रभाग ३९ – ४१२४
प्रभाग ४० – ५४३६
प्रभाग ४१- ४९४७