पुणे, दि.१८/०१/२०२६: पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजित पहिल्या टप्प्याच्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील स्पर्धा मार्गावरील सर्व प्रकारच्या खाजगी आणि सरकारी शाळांना मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.
पुणे जिल्हा प्रशासन, बजाज तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बजाज पुणे ग्रँड टूर-२०२६ युसीआय मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा १९ ते २३ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल यांनी निर्धारित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकानुसार आयोजित करण्यात येत असून २० जानेवारी रोजी या स्पर्धेचा पहिला टप्पा टि. सी.एल सर्कल हिंजवडी फेज-३ येथून सुरु होणार असून ती पुढे- टी.सी.एस सर्कल-मेगापोलीस सर्कल सिंफोनी सोसायटी समोरुन उजवीकडे वळून- बापुजी बुवा मंदिर मार्गे पुणे ग्रामीण हद्दीत जावून परत डोणे फाटा येथून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करुन पुढे रोहिदास मारुती सावळे चौक (डोणे फाटा) – डावीकडे वळून आढले बुद्रुक-बेबड ओहळ,- चांदखेड-कासारसाई-नेरे-मारुंजी-लक्ष्मी चौक-भुमकर चौक-अंडरपास मार्गे-डांगे चौक-अंडरपास मार्गे आदित्य बिर्ला हॉस्पिटल समोरुन रिव्हर व्ह्यू चौक वाल्हेकरवाडी-टि जंक्शन डावीकडेवळून छत्रपती शिवाजी महाराज चौक वाल्हेकरवाडी-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रावेत उजवीकडे वळून डॉ. डी. वाय पाटील कॉलेज आकुर्डी येथे समाप्त होणार आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.

More Stories
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ : जागतिक सायकलपटूंसाठी पुण्याचा उत्साहवर्धक अनुभव
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६: ढोल-ताशे, शिवगर्जना आणि सेल्फी, प्रोलॉग रेसमध्ये पुणेकरांचा रंगारंग स्वागत
यंदाचे ‘एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन’ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना समर्पित