October 16, 2025

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या अध्यक्षपदी पं बाळासाहेब सुर्यवंशी तर सचिवपदी पं सुधाकर चव्हाण यांची निवड

पुणे, दि. १५ मार्च, २०२३ : पं विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच संगीत अलंकार पं. बाळासाहेब सुर्यवंशी (गंगाखेड) यांची तर सचिवपदी पुण्याचे पं सुधाकर चव्हाण व जामिनीकांत मिश्र (जगन्नाथपुरी) यांची निवड झाली आहे.

संस्थेतर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या प्रबंध परिषदेत ही निवड करण्यात आली. या पदावरील त्यांचा कार्यकाळ हा सुमारे दोन वर्षे इतका असणार आहे. पं. बाळासाहेब सुर्यवंशी आणि पं सुधाकर चव्हाण हे गेली अनेक वर्ष मंडळात कार्यरत असून, विविध पदावरील जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

परिषदेत याव्यतिरिक्त संध्या केळकर यांची संस्थेच्या स्वीकृत सदस्या म्हणून निवड झाली आहे. तसेच मंडळाच्या ‘संगीत कलाविहार’या मासिकाच्या संपादक पदावरही केळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची स्थापना १९०१ मध्ये झाली असून संगीत शिक्षण देणारी ही देशातील महत्त्वाची संस्था म्हणून ओळखली जाते.

You may have missed