पुणे, ५/०८/२०२३: लष्कराच्या रक्षालेखा विभागातील अधिकारी महिलेची सायबर चोरट्यांनी ७६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत एका अधिकारी महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार अधिकारी महिला रक्षालेखा विभागात नुकत्याच रुजू झाल्या आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. एका ऑनलाइन शाॅपिंग ॲपचा प्रतिनिधी असल्याची बतावणी चोरट्यांनी केली होती. ऑनलाइन शाॅपिंग ॲपकडून बक्षीस देण्यात येणार असल्याचे आमिष चोरट्यांनी महिलेला दाखविले होते.
चोरट्यांनी महिलेकडून वेळोवेळी ७६ हजार रुपये उकळले. महिलेला बक्षीस दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार नोंदविली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटणकर तपास करत आहेत.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही