पुणे, २०/०९/२०२३: सदाशिव पेठेतील हत्ती गणपती चाैकात असलेल्या खाऊ गल्लीत वडापावची गाडी सुरू करण्याच्या वादातून वडापाव विक्रेत्याच्या डोक्यात कढई घालून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेश मगर (वय ३४, रा. कारगिल सोसायटी, गणेशपुरी, वारजे) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. मगर यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिद्धार्थ साळुंखे, संग्राम साळुंखे, उत्तरा साळुंखे (रा. ५०७, सदाशिव पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपाली गणेश मगर (वय २८) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हत्ती गणपती चौकातील खाऊ गल्लीत कल्पना जाधव यांची खाद्यपदार्थ विक्रीची गाडी आहे. जाधव यांनी मगर यांनी खाद्यपदार्थ विक्रीसाठी भाडेतत्वावर गाडी दिली आहे. मगर यांनी खाद्यपदार्थ विक्रीची गाडी लावल्याने आरोपी साळुंखे चिडले.
जाधव आणि मगर यांना शिवीगाळ केली. जाधव यांना दांडक्याने मारहाण केली. मगर यांच्या डोक्यात कढई मारल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. पोलीस उपनिरीक्षक फरताडे तपास करत आहेत.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही