पुणे, 18 फेब्रुवारी 2024: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा विभाग यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष आंतरराष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत माजी जागतिक क्र.24 खेळाडू कॅनडाच्या वासेक पोस्पिसिल याने तैपेईच्या पाचव्या मानांकित चुन-सीन त्सेंगचा 6-1,6-4 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या आदित्य बलसेकर, सिध्दांत बांठीया, अर्णव पापरकर यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले.
म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत 16 वर्षीय अर्णव पापरकरने आपली पहिलीच एटीपी स्पर्धा खेळत असताना सुंदर खेळाचे प्रदर्शन केले. ग्रेट ब्रिटनच्या फेलिक्स गिलने भारताच्या अर्णव पापरकरचा 6-3, 6-4 असा पराभव केला. हा सामना 1तास 13मिनिटे चालला.
पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलमेंट ऑथोरीटी (पीएमआरडीए) यांनी प्रायोजित ही स्पर्धा भारतातील एटीपी चॅलेंजर मालिकेतील तिसरी स्पर्धा आहे. यापूर्वीच्या दोन स्पर्धा बंगळुरू आणि चेन्नई येथे पार पडल्या आहेत.
माजी जागतिक क्र.17 खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या बर्नार्ड टॉमिकने भारताच्या आदित्य बलसेकरला 6-3, 6-1 असे पराभुत केले. माजी जागतिक क्र.42 फ्रांसच्या बेंजामिन बोन्झी याने भरताच्या सिद्धांत बांठियाचा 6-3,6-4 असा पराभव करून आगेकूच केली.
वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या आणखी दोन भारतीय खेळाडू ससीकुमार मुकुंद आणि निकी पोनाचा यांची देखील चुरस पाहायला उद्या मिळणार आहे.
निकाल: पहिली पात्रता फेरी:
बर्नार्ड टॉमिक(ऑस्ट्रेलिया)वि.वि. आदित्य बलसेकर(भारत)6-3, 6-1;
इव्हगेनी डोन्स्कॉय(रशिया)वि.वि.युरी झ्वाकियान(युक्रेन)6-7(5), 6-1, 6-0;
वादेम उरसु(युक्रेन)वि.वि.सॅम्युअल व्हिन्सेंट रुगेरी(इटली)(8) 7-6(3), 1-6, 6-0;
फेलिक्स गिल(ग्रेट ब्रिटन)वि.वि.अर्णव पापरकर(भारत)6-3, 6-4;
अलेक्सी झाखारोव्ह वि.वि.मोएझ इचारगुई(ट्यूनेशिया) 5-7, 6-3, 6-4;
युन सीओंग चुंग(कोरिया)वि.वि.रिओ नोगुची(जपान)7-5,7-6(5)
बेंजामिन बोन्झी(फ्रांस)वि.वि.सिद्धांत बांठिया(भारत)6-3,6-4
वासेक पोस्पिसिल(कॅनडा)वि.वि.चुन-सीन त्सेंग(तैपेई)(5) 6-1,6-4

More Stories
डकारचे आव्हान संजय दुसऱ्यांदा पेलणार, नववर्षातील रॅलीसाठी सज्ज
योनेक्स सनराईज डेक्कन जिमखाना आणि एसबीए कप डिस्ट्रिक्ट सुपर 100 मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्यातून 515 खेळाडू सहभागी
महाराष्ट्र क्रिकेट संघटना पुरुष कॉर्पोरेट चषक स्पर्धा २०२५–२६ ः पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत विजय