January 16, 2026

१९व्या आंतर युनिट पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड(पीएसपीबी) बिलियर्ड्स अँड स्नूकर स्पर्धेत ९ संघ सहभागी

पुणे, ४ मार्च २०२४: महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या वतीने आयोजित १९व्या आंतर युनिट पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड(पीएसपीबी) बिलियर्ड्स अँड स्नूकर स्पर्धेत ९ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये ५ ते ९ मार्च २०२४ या कालावधीत रंगणार आहे.

यामध्ये अनेकवेळा स्नूकर व बिलियर्ड्स स्पर्धेतील जागतिक विजेता पंकज अडवानी, सध्याचा अव्वल स्नूकरपटू ईशप्रीत सिंग चड्डा,आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आदित्य मेहता, माजी राष्ट्रीय विजेता आलोक कुमार, माजी राष्ट्रीय स्नूकर विजेता देवेंद्र जोशी, सौरव कोठारी, मनन चंद्रा, बिलियर्ड्स राष्ट्रीय विजेता ध्रुव सितवाला हे देशातील अव्वल स्नूकर खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

स्पर्धेत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, जीएआयएल(इंडिया) लिमिटेड, नुमलीघर रिफायनरी लिमिटेड, ऑईल इंडिया लिमिटेड, पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड,हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, मँगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड हे ९ संघ झुंजणार आहेत.

स्पर्धेचे सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक व आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.