पुणे, २६/०३/२०२४: ‘पुनीत बालन ग्रुप’ची पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटील हिने टाटा नगर (झारखंड) येथे झालेल्या ६ व्या ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२३-२४ स्पर्धेत’ एकेरी आणि महिला दुहेरीत दोन कांस्य पदके पटकावली.
कर्नाटकातील पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटीलचा नुकताच ‘पुनीत बालन ग्रुप’शी करार झाला. त्यानुसार आंतरराष्ट्रीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटीलच्या खेळातील करिअरसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. पाटील ही एक भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडू असून ती सध्या महिला एकेरी SU5 साठी पॅरा-बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत १० व्या क्रमांकावर आहे.
कर्नाटकातील नंदगड गावात जन्मलेल्या आरतीने २००८ मध्ये धावपटू म्हणून खेळायला सुरुवात केली. तेंव्हाच २००९ मध्ये तिने रॅकेट उचलण्याचा निर्णय घेतला आणि तेंव्हापासून बॅडमिंटनपटू म्हणून तिच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तिने आत्तापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदके जिंकली आहेत. नुकत्याच झारखंडमधील टाटा नगर येथे झालेल्या ६ व्या ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२३-२४’ या स्पर्धेत तिने एकेरी आणि महिला दुहेरीत दोन कांस्य पदके पटकावत आणखी एक उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल क्रिडा क्षेत्रात तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.
‘‘आरती पाटील ही एक प्रतिभावान आणि होतकरु खेळाडू आहे. ६ व्या ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत’ तिने हे दाखवून दिलं असून या दैदिप्यमान विजयाबद्दल तिचं मनःपूर्वक अभिनंदन! आपल्यातील पूर्ण क्षमता पणाला लावून ती खेळत असते. भविष्यातही ती अशाच प्रकारे यशाची वेगवेगळी शिखरं पार करील, असा विश्वास आहे आणि आम्ही तिच्या पाठीशी सदैव उभे राहू! – पुनीत बालन,
अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप

More Stories
डकारचे आव्हान संजय दुसऱ्यांदा पेलणार, नववर्षातील रॅलीसाठी सज्ज
योनेक्स सनराईज डेक्कन जिमखाना आणि एसबीए कप डिस्ट्रिक्ट सुपर 100 मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्यातून 515 खेळाडू सहभागी
महाराष्ट्र क्रिकेट संघटना पुरुष कॉर्पोरेट चषक स्पर्धा २०२५–२६ ः पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत विजय