पुणे, ४ जून २०२४ : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली आहे आतापर्यंत दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून यामध्ये भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी १२ हजार ६२९ मतांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर आघाडी घेतलेली आहे. अत्यंत चुरसची ही निवडणूक होत असून नेमका कोणाचा विजय होणार याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही.
पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कोरेगाव पार्क येथील शासकीय गोडाऊन येथे मतमोजणी सुरू आहे. दोन्ही पक्षाकडून कार्यकर्त्यांची यंत्रणा या ठिकाणी लावण्यात आलेली असून प्रत्येक यंत्रातून येणारे आकडे टिपण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी पहिल्या फेरीमध्ये 4765 मतांची आघाडी घेतलेली होती. यामध्ये केवळ कोथरूड आणि वडगाव शेरी या दोन मतदारसंघातूनच मोहोळ यांना आघाडी आहे. तर कसबा पर्वती शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट या चार मतदारसंघातन रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. मात्र या चार मतदारसंघातून मिळणारी आघाडी कोथरूड आणि वडगाव शेरीच्या तुलनेत कमी असल्याने आघाडीवर आहेत याच पद्धतीचा ट्रेंड हा दुसऱ्या फेरीमध्ये दिसून आला असून मुरलीधर मोहोळ हे 7 हजार 764 मतांनी आघाडीवर आहेत त्यामुळे या दोन फेरीमधील त्यांचे एकूण मताधिक्य 12 हजार 629 तर पोहोचले आहे अजून 18 मतदान मोजणीच्या फेऱ्या होणे शिल्लक आहे त्यामुळे नेमका यामध्ये निकाल काय लागेल हे सांगता येत नाही. तिसरी फेरीअखेर मुरलीधर मोहोळ 18 हजार 923 मतांनी आघाडीवर
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी