पुणे, २९ जुलै २०२४ : ‘‘पुणे महापालिकेचा विस्तार वाढत असून, नवीन समाविष्ट गावांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना प्रशासनावर मोठा ताण पडत आहे. याबाबत सर्वांनी एकत्रित येऊन पुणे शहराच्या पूर्व भागासाठी नवीन महापालिकेबाबत योग्य तो निर्णय घेण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले.
वानवडीमधील महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवनात रविवारी सातारा जिल्हा मित्र मंडळाचा सुवर्ण महोत्सव पार पडला. या प्रसंगी सातारा जिल्हा मित्र मंडळ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. पवार यांच्या हस्ते अजिंक्यतारा पुरस्कार यशवंत साळुंखे यांना देण्यात आला. तर कृष्णा-कोयनामाई पुरस्कार आदिती गोपीचंद स्वामी यांना प्रदान करण्यात आला.
माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, माजी आमदार महादेव बाबर, जगन्नाथ बापू शेवाळे, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, माजी नगरसेवक अभिजित शिवरकर, प्रवीण तुपे, जे. पी. देसाई, एस. बी. पाटील, अण्णा साळुंखे, दशरथ जाधव, संदीप साळुंखे आदी या वेळी उपस्थित होते.
प्रारंभी माजी राज्यमंत्री शिवरकर यांनी मनोगत व्यक्त केले. ‘‘सध्या आरक्षणाच्या मुद्यावरून वाद सुरू असून, त्यात आपण मध्यस्थी करावी. तसेच, पुणे शहराच्या पूर्व भागासाठी नव्या महापालिकेची गरज असून, त्याबाबत विचार व्हावा,’’ अशी मागणी त्यांनी पवार यांच्याकडे केली.
हडपसर मतदारसंघ काँग्रेसला सोडावा-
या वेळी पवार यांनी माजी नगरसेवक शिवरकर यांच्या संपर्क कार्यालयास भेट दिली. त्यावेळी आगामी निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदार संघ हा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावा, अशी मागणी हडपसर मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी