पुणे, 27/12/2024: ‘जयहिंद लोकचळवळ’या संस्थेतर्फे पुण्यातील युवा गांधी अभ्यासक संकेत मुनोत यांना पद्मश्री इंद्रा उदयन(बाली)यांच्या हस्ते ‘युवा गांधीयन’ हा पुरस्कार नुकताच गांधींतीर्थ,जळगाव येथे देण्यात आला. ‘जयहिंद लोकचळवळ’चे संस्थापक डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, गांधी तीर्थ (जळगाव)चे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन झाला,प्रमोद चुंचूवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
संकेत मुनोत यांनी ‘नोईंग गांधी ग्लोबल फ्रेंड्स’ आणि ‘नाते टिकवूया’ या २ लोकचळवळी सुरु केल्या असून त्या माध्यमातून समाजात सलोखा,प्रेम वाढवण्याचे कार्य चालते. नोईंग गांधी ग्लोबल फ्रेंड्स चे १२ हजार सदस्य आहेत.मुनोत हे आर्थिक नियोजन आणि आर्थिक साक्षरता या क्षेत्रातही कार्य करत आहेत.याच कार्यक्रमात सचिन इटकर यांना त्यांच्या जागतिक संपर्कासाठी ‘फ्रेंड्स ऑफ जयहिंद’ हा पुरस्कारही देण्यात आला.देशात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जात, धर्म, पंथ, वर्ग याबद्दलच्या द्वेषाबद्दल संकेत मुनोत यांनी यावेळी उपस्थित लोकांचे लक्ष वेधले.’ प्रेम आणि संवादाने सर्व एकत्र आले तरच देश वाचेल’,असे ते यावेळी म्हणाले.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही