पुणे, 28 डिसेंबर 2024: सुधांशु बॅडमिंटन अकादमी यांच्या वतीने आयोजित डेक्कन जिमखाना पुरस्कृत योनेक्स सनराईज एसबीए कप जिल्हास्तरीय सुपर 100 मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत 17 वर्षांखालील गटात अधिश ए, प्राजक्ता गायकवाड यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आगेकूच केली.
डेक्कन जिमखाना बॅडमिंटन कोर्ट या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित अधिश ए याने अव्वल मानांकित निक्षेप कात्रेचा 15-6, 7-15, 15-12 असा तीन पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. चौथ्या मानांकित सुदीप खोराटेने अकराव्या मानांकित अभिज्ञान एल सिंघावर 15-10, 11-15, 15-6 असा विजय मिळवला. तिसऱ्या मानांकित तनिष्क आडेने सहाव्या मानांकित श्रेयस मसलेकरचा 15-9, 15-13 असा तर, कपिल जगदाळेने अनय एकबोटेचा 15-7, 12-15, 15-10 असा पराभव करून आगेकूच केली. याच मुलींच्या गटात तिसऱ्या फेरीत बिगर मानांकित प्राजक्ता गायकवाडने दुसऱ्या मानांकित जिया उत्तेकरचा 15-9, 6-15, 15-9 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.
13 वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित सिबतैनरझा सोमजीने सातव्या मानांकित आरुष सापलेचा 12-15, 15-11, 16-14 असा संघर्षपूर्ण प्रभाव केला. तिसऱ्या मानांकित विहान कोल्हाडेने आठव्या मानांकित आर्यन भोसलेवर 15-4, 15-7 असा विजय मिळवला. दहाव्या मानांकित मिहिर इंगळेने सहाव्या मानांकित दियान पारेखचे आव्हान 9-15, 15-11, 15-11 असे संपुष्टात आणले.
निकाल: 13 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
सिबतैनरझा सोमजी [1]वि.वि.आरुष सापले [7] 12-15, 15-11, 16-14;
विहान कोल्हाडे [3]वि.वि.आर्यन भोसले [8] 15-4, 15-7;
मिहिर इंगळे [10]वि.वि.दियान पारेख [6] 9-15, 15-11, 15-11;
हृदय पाडवे [2] वि.वि. शाराव जाधव [5] 15-11, 15-11;
13 वर्षांखालील मुली:
ख्याती कत्रे [1]वि.वि.आध्या शिंदे [10] 15-4, 15-5;
स्वराली थोरवे [7] वि.वि.ऋषिका रसाळ [9] 15-11, 15-10;
समन्वया धनंजय [3]वि.वि.निधी गायकवाड [13] 15-7, 16-14;
अग्रिमा राणा [15] वि.वि.उत्कर्षा शर्मा 15-13, 15-10;
17 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
अधिश ए [5] वि.वि.निक्षेप कात्रे [1] 15-6, 7-15, 15-12;
सुदीप खोराटे [4] वि.वि.अभिज्ञान एल सिंघा [11] 15-10, 11-15, 15-6;
तनिष्क आडे [3] वि.वि.श्रेयस मसलेकर [6] 15-9, 15-13;
कपिल जगदाळे वि.वि.अनय एकबोटे 15-7, 12-15, 15-10;
17 वर्षांखालील मुली: तिसरी फेरी:
मनीषा तिरुकोंडा विष्णू कुमार [1] वि.वि. सई कदम 15-9, 15-12;
लाभा मराठे [6] वि.वि.रिया चोपडा 15-5, 15-9;
आयुषी मुंडे वि.वि.लारण्या नलावडे 15-8, 15-5;
भूमिका शौर्य वि.वि. प्रणाली डोईफोडे [7] 15-8, 15-10;
मौसम माने पाटील वि.वि.सुरभी आखाडे 15-10, 15-8;
नव्या रांका [4] वि.वि.अनन्या मालुंजकर 15-7, 15-8;
प्राजक्ता गायकवाड वि.वि.जिया उत्तेकर [2] 15-9, 6-15, 15-9;
More Stories
पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना मैत्रीपूर्ण बॅडमिंटन लीग स्पर्धेत कटक्कर ईगल्स संघाला विजेतेपद
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला