पुणे, 07 जानेवारी 2025:- चीनमध्ये मानवी मेटाप्युमोव्हायरसचा (HMPV) संसर्ग वेगानं वाढल्यानंतर भारतातदेखील रुग्ण दिसून येत आहेत. देशात सर्वप्रथम बंगळुरूमध्ये दोन मुलांना एचएमपीव्हीची लागण झाल्याचं निदान झाले. त्यानंतर हळूहळू याचे रुग्ण वाढत असून आत्ता राज्यात देखील या व्हायरसचे रुग्ण आढळून आल्याचं बोललं जात आहे. पण अस असल तरी अवघड नाव असलेला हा विषाणू खूप सौम्य असून वीस ते पंचवीस वर्षापासून वैद्यकीय जगताला माहित असलेला हा विषाणू आहे.तसेच भारतात मागच्या वर्षी डिसेंबर पर्यंत आपल्याकडे 172 रुग्ण विविध प्रयोगशाळांनी शोधले होते आणि विशेष बाब म्हणजे यात कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता असा हा व्हायरस अत्यंत सौम्य प्रकारचा असल्याचं साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितल आहे.
याबाबत महाराष्ट्राचे माजी साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले की सध्या एका विषाणूची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर केली जातं आहे. मेटाप्युमो व्हायरस बाबत चीन मधून काही बातम्या येताना दिसत आहे. पण या व्हायरसच्या नावाप्रमाणेच त्याचं मेटाकुटीला जाऊन विचार कराव एवढा महत्त्वाचा हा व्हायरस नाही. तसेच हा व्हायरस नवीन नसून अगदी जुना व्हायरस आहे. वीस ते पंचवीस वर्षापासून वैद्यकीय जगताला माहित असलेला हा विषाणू आहे. तसेच भारतात मागच्या वर्षी डिसेंबर पर्यंत आपल्याकडे 172 रुग्ण विविध प्रयोगशाळांनी शोधले होते.विशेष बाब म्हणजे यात कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. हा व्हायरस अत्यंत सौम्य प्रकारचा असून ज्यात सर्दी खोकला होत असतो अस यावेळी आवटे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की मेटाप्युमो व्हायरस सारखे अनेक विषाणू आपल्याकडे आहे.हिवाळ्यात किंवा उन्हाळ्याच्या सुरवातीला जे सर्दी खोकल्याचे प्रमाण वाढतं त्याच्यासाठी जे जबाबदार विषाणू असतात त्या गटातील हा एक विषाणू आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कोणतेही कारण नाही.यात जे पाच वर्षाखालील मुल तसेच 65 वर्षातील व्यक्ती ज्यांची ह्युम्युनिटी कमी आहे अश्या व्यक्तींमध्ये क्वचित प्रमाणात हा विषाणू गंभीर ठरू शकतो. पण या विषाणूमुळे घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही कोणीही घाबरून जाऊ नये. विशेष म्हणजे यासाठी औषधाची देखील गरज नसून घरगुती उपचाराने हा आजार बरा होऊ शकतो अस यावेळी आवटे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की या आजरासाठी कुठलीही लस नसून हात वारंवार धुणे,तसेच सर्दी खोकला असल्यास मास्क लावून बाहेर जाणे,तसेच जनसंपर्क कमी करने,नाकाला वारंवार हात न लावणे, आहार चांगल घेणे,पुरेशी झोप घेणे अश्या ज्या सध्या गोष्टी आहे त्या केल्या पाहिजे.अश्या या अवघड नावाच जे विषाणू आलं आहे त्याच जरी नाव आवघड असला तरी हा खूप साधा विषाणू असून घाबरून जाण्याची कोणतीही गरज नाही.जी खबरदारी आपण सर्दी खोकला झाल्यावर घेतो तीच खबरदारी यात घ्यायची असल्याचं यावेळी आवटे म्हणाले.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी