पुणे, 31/01/2025: देशभरातील 40 हून अधिक कलाकारांच्या कलाकृती असलेल्या ‘सप्तरंगी’ कला प्रदर्शनाला आज (शुक्रवार) पासून सुरुवात झाली आहे. कला, भारतीय संस्कृती आणि पर्यावरणाला समर्पित हिसारच्या टैलेंटिला फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आर्ट गॅलरी येथे या कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून हे प्रदर्शन 2 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे.
सप्तरंगी कला प्रदर्शनाचे उद्घाटन सहभागी महिला कलाकारांच्या हस्ते करण्यात आले. या कला प्रदर्शनात देश-विदेशातील प्रसिद्ध कलाकार हरिप्रिया नरसिंहान, सोनल सक्सेना, मोनिता ढींगरा, केदारनाथ भागवत, राखी कुमारी, दत्तात्रय खेळकर, सुधीर करणडे, अर्चना श्रीवास्तव, रचना सिंह, हेरिबेर्टो नोपनी, नरेंद्र गंगाखेडकर, सतीश पोटदार, धात्री थानकी, कारमेला न्यूनेज, संजय उमरानीकर, निहारिका श्रीवास्तव, जयश्री पाटील, क्रेजेंटा कदम, आर्या कुलकर्णी, माधुरी गयावाल, विनय जोशी, हीरालाल गोहिली, प्रीती राऊत, विभावरी देसाई, इशिता रामाप्रसाद, अंजन रॉय, सोलेदाद बुरगालेता, भाग्यश्री गोडबोले, डॉ बाय एस कुलकर्णी, दत्तात्रेय
खेडकर आदींसह 40 कलाकारांच्या चित्रांचा समावेश आहे.
टैलेंटिला फाउंडेशनच्या संस्थापक आणि संचालक अनुराधा खरे आणि विनीत खरे यांनी सांगितले की, आमच्या संस्थेचे पुण्यातील हे दुसरे कला प्रदर्शन आहे. या कला प्रदर्शनात विविध प्रकारच्या कलांचे प्रदर्शन करण्यात आले आहे, तसेच देशातील प्रसिद्ध कलाकार संजय उमरानीकर, मोनिता ढींगरा, विभावरी देसाई, केदारनाथ भागवत लाईव्ह आर्ट डेमो देणार आहेत. सहभागी सर्व कलाकारांचा सन्मान समारोप प्रसंगी केला जाणार आहे. ‘सप्तरंगी’ हे प्रदर्शन 2 फेब्रुवारी पर्यंत दुपारी 12 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार असून मोफत प्रवेश आहे.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही