पुणे, ६ फेब्रुवारी २०२५ ः पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (स्वनिधी) पीएम स्वनिधी योजनेच्या “स्वनिधी से समृद्धी’ अंतर्गत शहरातील कुटुंबांचे महापालिकेकडुन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासंबंधिची माहिती पोर्टलवर भरली जाणार आहे.
महापालिका प्रशासनाकडुन पीएम स्वनिधी योजना शहरात राबविण्यात येते. या योजनेअंतर्ग “स्वनिधी से समृद्धी’ अंतर्गत कुटुंबांचे सर्वेक्षण होणार आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालये व पथविक्रेत्यांच्या व्यावसायाच्या ठिकाणी महापालिकेने नेमलेले प्रतिनिधी जाऊन पथविक्रेत्यांच्या कुटुंबांची माहिती पीएम स्वनिधीच्या पोर्टलवर भरणार आहेत. ज्या पथविक्रेत्याने स्वनिधी योजनेचा लाभ घेतला आहे, मात्र अद्याप कुटुंबाची माहिती दिलेली नाही. अशा पथविक्रेत्यांनी त्वरीत क्षेत्रीय कार्यालयातील समाज विकास विभागातील समूहसंघटीका व संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधुन कुटुंबांचे सर्वेक्षण पुर्ण करण्याची कार्यवाही करावी. तसेच, शहरातील सर्व पथ विक्रेत्यांनी केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे सर्वेक्षण पुर्ण करुन घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी केले आहे.
More Stories
Pune: मेधा ताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही – रुपाली ठोंबरे पाटील
Pune: जैन बोर्डिंग जागा विक्रीव्यवहार प्रकरणाला जैसे थे ठेवण्याचे आदेश
Pune: पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ रंगणार २ ते १६ नोव्हेंबरदरम्यान