पुणे, ०७/०२/२०२५: ‘पुण्यात राहणारऱ्या २९ वर्षीय आयटी इंजिनियर असलेलया स्वाती ने (नाव बदलले) करियर मध्ये सेटल झाल्यावर वर्षभरापूर्वी मॅट्रिमोनियल साईट वर जोडीदार शोधण्यास सुरवात केली. त्यावरून तिला तिच्याच समाजातील ३२ वर्षीय मुलासोबत ओळख झाली. त्याने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बुटीक वस्तू विक्रीचा बिझनेस असल्याचे आणि कुर्ल्यात स्वतःचे घर असल्याचे स्वातीला सांगितले. दोघे अनेकवेळा भेटले आणि त्यांनी एकत्र येण्याचे ठरवले. स्वातीने ही बाब घरच्यांच्या कानावर घातली. काही दिवसांनी मग दोन्ही परिवारामध्ये लग्नाची बोलणी सुरु झाली व दोघेही विवाहबंधनात अडकले. आता सर्व काही मनासारखे झाल्याच्या आनंदात सुखी संसार करण्याचे स्वप्न स्वाती पाहत होती. पण लग्नाच्या पहिलाच रात्री तीच्या स्वप्नांना सुरुंग लागला. पहिल्याच रोमँटिक क्षणाच्या रात्री त्याने स्वातीला तो खूप आर्थिक अडचणीत असल्याचे सांगत पाच लाख दे नाहीतर तिच्या शरीराला हातही लावणार नाही अशी अजब अट घातली. केवळ हेच नाही तर यानंतरही अनेक कारणे सांगून त्याने स्वातीला कर्जबाजरी करून नंतर काही महिन्यातच तिला १६ ते १७ लाखांचा चुना लावून हा ‘लखोबा लोखंडे’ पसार देखील झाला.
याबाबत स्वातीने पोलिसांची मदत घेणायचा प्रयत्न केला पण पोलिसांनी ही कौटुंबिक बाब असल्याचे सांगत हात झटकले. आता त्याचा माग काढण्यासाठी स्वातीने स्विफ्ट डिटेक्टिव्ह या डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घेतली असून आता त्या माध्यमातून त्याचे अनेक कारनामे समोर येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट वरून सावज हेरने आणि लुटणे असा त्याच्या धंदा असल्याचे समजले. याआधी त्याने असे ३ प्रकरणे केल्याचे देखील माहिती मिळाली आहे. त्यामध्ये त्याची आई देखील सामील आहे. आता लवकरच स्वाती स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सीच्या मदतीने पुरावे गोळा करून त्यांना कायद्याच्या कचाट्यात पकडून त्याचा परदा फाश करणार आहे. लग्नाच्या अमिशाने फसवणूक झालेली स्वाती हे एक प्रतिनिधीक उदाहरण असले तरी पुण्या-मुंबई सारख्या मोठ्या शहरात स्वतःला सिद्ध करण्यासाठी आलेल्या अनेक तरुणीसोबत असे ‘मॅट्रिमोनियल फ्रॉड’ होत आहेत. त्यासाठी या तरुणींनी मॅट्रिमोनियल साईट वरून संपूर्ण विश्वास न टाकता भावी वधु किंवा वराची माहिती घेऊन त्याची पडताळणी करून मगच विवाहाचा निर्णय घेणे गरजेचे झाले आहे. कारण समाजात असे अनेक लखोबा लोखंडे या तरुणींची फसवणूक करण्यासाठी व तिच्या आयुष्यासोबत खेळण्यासाठी टपून बसलेले आहेत. परंतु त्यांना ओळखणे देखील आव्हानात्मक बनलेले आहे.
स्वातीच्या बाबतही असेच झाले. अनेक प्रकरणात विवाह करताना मुली घरच्यांना सांगत नाहीत आणि मग फसतात. परंतु या प्रकरणात तर दोन्ही घरचे इन्व्हॉल्व होते. या लखोबाने स्वतःचा म्हणून मित्राचा फ्लॅट त्यांना दाखवला. पहिल्या रात्रीचा अनुभव आल्यावर स्वातीने ही बाब घरच्यांना सांगितली नाही. तिला वाटले त्याला त्याचा खरोखर आर्थिक प्रॉब्लेम असेल असे समजून दुर्लक्ष केले. पण यानंतरही त्याने हनिमून ला जाऊ असे सांगून स्वातीला कर्ज काढायला लावले. घर रेंटने घेतले तेथे फर्निचर केले. खर्चासाठी तिने डाग दागिने देखील विकले. असे अनेक करणे सांगून १५ ते १६ लाख तिच्याकडून उकळले आणि अवघ्या ४ महिन्यात नवरोबाने त्याच्या आईने म्हणजे स्वातीच्या सौसून पळ काढला. जाताना अगदी निरमा डिटर्जंट, किराणा माल, सोफा, टीव्ही देखील चट पसार केले. यावेळी स्वाती माहेरी गेली होती. परत येऊन पाहते तर हा प्रकार तिच्या लक्षात आला. त्यांचा मोबाईल देखील स्विच ऑफ येत होता. काहीच संपर्क होत नसल्याने यानंतर स्वातीने स्विफ्ट डिटेक्टिव्ह ची मदत घेतली असून माहिती आणि पुरावे गोळा करत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना स्विफ्ट डिटेक्टिव्ह च्या संचालक प्रिया काकडे म्हणाल्या की, आमच्या टीम ने या प्रकरणाची माहिती घेण्यास आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरु केले आहे. त्याचे कुर्ल्यामध्ये १० बाय १० चे घर असून तेथे त्याचे वडील एकटेच राहतात. त्यांचा याबाबत काही संबंध नाही. पण त्यांचा मुलगा आणि आणि पत्नी मात्र फरार असून त्याचे दुसऱ्या मुलीसोबत आता अफेअर सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. तो अजूनही रिल्स बनवतो आणि त्या माध्यमातून आणखी काही तरुणींना जाळ्यात ओढू शकतो. त्याची सर्व माहिती गोळा करून त्याच्यापासून घटस्फोट घेणे, पोटगी मिळवणे आणि लुबाडलेली पूर्ण रिकव्हर करणे हा आमचा पुढील उद्देश आहे.
जेव्हा तुम्ही मॅट्रिमोनियल साईटवर कोणाला भेटता तेव्हा त्याबाबत सर्व माहीती करून घ्या. अशा सायिटवर जवळपास 90 टक्के प्रोफाइल फेक असतात. अगदी मुलींना विकण्यापर्यंत काही केसेस घडलेल्या आहेत. म्हणून लग्न जमवण्यासाठी सोशल मीडिया हा योग्य प्लॅटफॉर्म नाही. भावी वराची स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सी च्या मदतीने प्री मॅट्रिमोनियल प्रोफाइल काढा. त्याने सांगितलेल्या प्रॉपर्टीवर प्रत्यक्ष जा. त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का याचे क्रिमिनल रेकॉर्ड काढा. शेजारी पाजारी चौकशी करा. जरी असा फ्रॉड झाला तरी पोलीस कौटुंबिक बाब म्हणून त्यात फारसी दखल देत नाही. म्हणून स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सीच्या मदतीने त्याची पूर्ण माहिती काढून त्याच्या विरोधात पुरावे गोळा करून तुम्हाला न्याय देण्याचे आणि एक प्रकारे खूप मदत करण्याचे काम करते. अशा प्रकारच्या अनेक केसेस आम्ही सोडवल्या आहेत.
– प्रिया काकडे, संचालक, स्विफ्ट डिटेक्टिव्ह
More Stories
Pune: मेधा ताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही – रुपाली ठोंबरे पाटील
Pune: जैन बोर्डिंग जागा विक्रीव्यवहार प्रकरणाला जैसे थे ठेवण्याचे आदेश
Pune: पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ रंगणार २ ते १६ नोव्हेंबरदरम्यान